पुतीन वेड लागल्यासारखे वागत आहेत - ट्रम्प

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, आमचे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत, रशिया आणि युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी आम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र पुतीन यांना नक्की काय झाले आहे ते कळत नाही. ते वेड लागल्यासारखे वागत असल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
पुतीन वेड लागल्यासारखे वागत आहेत - ट्रम्प
Published on

न्यू जर्सी : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, आमचे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत, रशिया आणि युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी आम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र पुतीन यांना नक्की काय झाले आहे ते कळत नाही. ते वेड लागल्यासारखे वागत असल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. पुतीन युक्रेनची राजधानी कीव्हसह अन्य शहरांवर क्षेपणास्त्र मारा करत खूप लोकांना ठार मारत आहेत. त्यांना संपूर्ण युक्रेन हवे असेल तर ते रशियाच्या पतनास कारणीभूत ठरेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

शनिवारी रात्रीपासून रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला केल्यानंतर न्यू जर्सीमधील मॉरिसटाऊन विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते. शनिवारी रात्री रशियाने युक्रेनची राजधानी कीव्‍हसह अन्य शहरांवर ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात १३ जण झाले, तर अनेक जण जखमी झाले. ४५ क्षेपणास्त्रे पाडल्याचा आणि २६६ ड्रोन नष्ट केल्याचा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केला आहे. या हल्ल्यावर बोलताना ट्रम्प म्हणाले की, पुतिन यांना नेमके काय झाले आहे हे मला माहिती नाही. आजवर नेहमीच मी त्यांच्याबरोबर तडजोडीची भूमिका घेतली आहे; पण आता ते थेट हवाई हल्ला करत युक्रेनमधील नागरिकांना ठार मारत आहे. मला हे अजिबात आवडलेले नाही, असे ट्रम्प म्हणाले.

रशिया आणि युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी आम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा वेळी पुतीन हे युक्रेनवर हवाई हल्ला करत आहेत. त्याचे हे वर्तन मला अजिबात आवडलेले नाही. त्यांना संपूर्ण युक्रेन हवे असेल तर ते रशियाच्या पतनास कारणीभूत ठरतील, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, ट्रुथ सोशल मीडियावरील पोस्टमध्येही ट्रम्प यांनी युक्रेनमधील शहरांवरील हवाई हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

मौनामुळे प्रोत्साहन

यापूर्वी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले होते की, अमेरिकेने आम्हाला दिलेला प्रतिसाद हा अत्यंत निराश करणारा आहे. जग सुट्टीवर जाऊ शकते, परंतु युद्ध सुरूच आहे. रशिया आमच्यावर हल्ले करीत आहे. अमेरिकेचे मौन पुतीन यांना प्रोत्साहन देते आहे. जागतिक दबाव येत नाही तोपर्यंत रशिया युक्रेनवर हल्ले करतच राहील.

logo
marathi.freepressjournal.in