भारतावर लादलेल्या टॅरिफचा अमेरिकेलाच फटका; ट्रम्प यांच्या माजी सहकाऱ्याचे विधान चर्चेत

अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर शुल्क लादण्याच्या निर्णयाचे परिणाम अमेरिकेसाठी अत्यंत वाईट ठरल्याचे म्हटले आहे. यामुळे नवी दिल्लीला दूर ढकलण्यात आले आणि रशिया व चीनपासून भारताला दूर करण्याच्या अमेरिकेच्या दशकांच्या प्रयत्नांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
भारतावर लादलेल्या टॅरिफचा अमेरिकेलाच फटका; ट्रम्प यांच्या माजी सहकाऱ्याचे विधान चर्चेत
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर शुल्क लादण्याच्या निर्णयाचे परिणाम अमेरिकेसाठी अत्यंत वाईट ठरल्याचे म्हटले आहे. यामुळे नवी दिल्लीला दूर ढकलण्यात आले आणि रशिया व चीनपासून भारताला दूर करण्याच्या अमेरिकेच्या दशकांच्या प्रयत्नांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

बोल्टन म्हणाले की, त्यांच्या निर्णयाचा उलटा परिणाम झाला. भारताबरोबरचे संबंध ताणले आणि चीनला मोकळीक देण्यात आली. यामुळे अमेरिकेचे महत्त्वाचे ध्येय कमकुवत झाले. नवी दिल्लीवर रशियन तेल खरेदी केल्याच्या मुद्द्यावर लावण्यात आलेल्या प्रचंड शुल्काकडेही बोल्टन यांनी बोट दाखवले आणि याचवेळी ट्रम्प हे भारतापेक्षा चीनला पसंती देत असल्याचा आरोपही केला, तसेच ही एक प्रचंड मोठी चूक ठरू शकते.

एप्रिलमध्ये चीनबरोबर टॅरिफवरून संघर्ष झाला, पण त्यांच्यात करार केला जाणार असल्याने तो वाढणार नाही याची काळजी घेतली, तर दुसरीकडे रशियाला युक्रेनविरोधातील लढाईत आर्थिक निधी पुरवत असल्याचा दावा करत भारतावर ५० टक्के शुल्क लादण्यात आले आहे. बोल्टन पुढे म्हणाले की, रशियाला नुकसान पोहचवण्यासाठी असलेले सेकंडरी टॅरिफ हे भारताला रशिया आणि चीन यांच्या जवळ घेऊन जाऊ शकते आणि कदाचित हे तिन्ही देशांना एकत्र अमेरिकेबरोबर वाटाघाटी करण्यास परावृत्त करू शकते. ट्रम्प यांची चीनवर दाखवलेली उदारता आणि भारतावर मोठ्या प्रमाणात शुल्क लादणे यामुळे रशिया आणि चीन यांच्यापासून भारताला दूर आणण्याचे अमेरिकेचे दशकांपासूनचे प्रयत्न धोक्यात आले आहेत, असेही बोल्टन म्हणाले.

ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी गुडघे टेकू नयेत

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकू नयेत, असे अमेरिकेचे माजी उपपरराष्ट्र मंत्री कर्ट कॅम्पबेल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. त्यांनी ट्रम्प यांच्या भारतावरील टॅरिफ धोरणावर टीका केली. या टॅरिफमुळे अमेरिका-भारत संबंध आता धोक्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

कर्ट कॅम्पबेल यांनी यावेळी भारताला सल्ला दिला की, मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकू नयेत. रशियाशी असलेल्या संबंधांबाबत अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचे उलट परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही भारताला सांगितले की, रशियाशी असलेल्या संबंधांचा त्याग करावा लागेल, तर भारतीय रणनीतीकार अगदी उलट करतील, असे कॅम्पबेल पुढे म्हणाले.

ट्रम्प स्वतःचा नाश करत आहेत

वॉशिंग्टन : अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि जॉन हॉपिकन्स विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीव्ह हँके यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प यांचा टॅरिफ वाढीचा निर्णय हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो दीर्घकाळ टिकणार नाही, तसेच व्यापार युद्ध सुरू करून ट्रम्प स्वतःचा नाश करत आहेत, असे हँके यांनी म्हटले आहे. भारताबाबत हँके म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे पत्ते राखून ठेवावेत आणि थोडा वेळ वाट पहावी. कारण ट्रम्प यांचे पत्त्यांचे घर हे काही दिवसांतच कोसळेल, टॅरिफचे तुणतुणे अधिक काळ वाजणार नाही. आपल्या विधानासाठी प्राध्यापक हँके यांनी नेपोलियनचे एक वाक्य उद्धृत केले.

logo
marathi.freepressjournal.in