

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेसाठी आवश्यक असलेली पावले हंगामी राष्ट्राध्यक्षांनी न उचलल्यास त्यांचे परिणाम मादुरो यांच्यापेक्षाही भयानक असतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्याशी चर्चा केली. व्हेनेझुएलाच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्यास ते तयार असल्याचे दिसत आहे. रॉड्रिग्ज यांनी अमेरिकेचे ऐकल्यास व्हेनेझुएलात अमेरिकन सैन्य तैनात करण्याची गरज लागणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. डेल्सी रॉड्रिग्ज यांनी निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवण्याच्या कृतीवर टीका केली. तसेच मादुरो यांना परत व्हेनेझुएलात पाठवण्याची मागणी केली आहे.
व्हेनेझुएलाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रॉड्रिग्ज यांनी हंगामी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.