ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयाचा धसका; 7 व्या, 8 व्या महिन्यातच बाळाला जन्म देण्यासाठी भारतीय दाम्पत्यांची रुग्णालयांत गर्दी

ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकन भारतीयांनी धसका घेतला आहे. आपल्या मुलाला जन्मतः नागरिकता मिळवण्यासाठी भारतीय दाम्पत्यांची धडपड सुरू आहे. त्यासाठी ते सिझेरियन प्रसुतीचा विचार करत आहेत. त्यामुळे प्रसुती रुग्णालयांत भारतीय दाम्पत्यांनी सी-सेक्शमध्ये गर्दी केली आहे.
ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयाचा धसका; 7 व्या, 8 व्या महिन्यातच बाळाला जन्म देण्यासाठी भारतीय दाम्पत्यांची रुग्णालयांत गर्दी
ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयाचा धसका; 7 व्या, 8 व्या महिन्यातच बाळाला जन्म देण्यासाठी भारतीय दाम्पत्यांची रुग्णालयांत गर्दीbaby
Published on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार सांभाळताच एकापाठोपाठ एक निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांनी जवळपास 100 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यांनी अवैध स्थलांतरितांना अमेरिकेत बंदी; मेक्सिको सीमेवर आणीबाणी, जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेची माघार, सीमा सुरक्षा, टिकटॉकच्या कालावधीत वाढ, या काही निर्णयांसोबतच जन्माने मिळणारा नागरिकत्वाचा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे. नवीन नियम 20 फेब्रुवारीपासून लागू होतील. ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकन भारतीयांनी धसका घेतला आहे. आपल्या मुलाला जन्मतः नागरिकता मिळवण्यासाठी भारतीय दाम्पत्यांची धडपड सुरू आहे. त्यासाठी ते सिझेरियनद्वारे प्रसुतीचा विचार करत आहेत. त्यामुळे प्रसुती रुग्णालयांत भारतीय जोडप्यांची 'सी-सेक्शन'मध्ये गर्दी होत आहे.

7 व्या-8 व्या महिन्यात मुलांना जन्म देण्यासाठी दाम्पत्यांची धडपड

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या या निर्णयाचा धसका घेतलेल्या भारतीय जोडप्यांनी मूदतपूर्व प्रसुतीसाठी रुग्णालयांच्या 'सी सेक्शन'मध्ये धाव घेतली आहे. न्यू जर्सी येथील प्रसुती रुग्णालयाच्या डॉ. एस. डी. रामा यांनी म्हटले आहे की, त्यांना गेल्या काही तासांपासून अनेक दाम्पत्यांचे फोन येत आहेत ज्यांनी सी-सेक्शनमध्ये (सिझेरियन-सिझर) मूदतपूर्वी प्रसुती करून देण्यासाठी विनंती केली आहे. यामध्ये 8 आणि 9 महिन्यांच्या गरोदर महिलांची संख्या जास्त आहे. 20 फेब्रुवारीपूर्वी प्रसुतीसाठी त्यांनी सी-सेक्शनसाठी विचारणा केली आहे. तरी काही महिला अशाही आहेत की त्यांना अजून प्रसुतीसाठी जास्त महिन्यांचा कालावाधी आहे. मात्र, त्यांनीही संपर्क साधला आहे.

काय आहे अमेरिकेतील जन्माने मिळणाऱ्या नागरिकतेचा कायदा

अमेरिकेत स्थायिक होण्याचे अनेक भारतीयांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक जण वैध-अवैध मार्गाने अमेरिका गाठतात. तिथेच स्थायिक होतात. कालांतराने त्यांनी तिथे मुलाला जन्म दिला तर त्या मुलाला अमेरिकेच्या कायद्यानुसार आपोआपच नागरिकता प्राप्त होते. मात्र, आता या कायद्यात सुधारणा करून ट्रम्प यांनी स्थलांतरितांच्या मुलांना जन्मानुसार मिळणारे नागरिकत्व समाप्त केले आहे. नवीन नियमावली येत्या 20 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. परिणामी ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि कायमस्वरुपी अमेरिकेचे नागरिक होण्याचे अनेक भारतीय जोडप्यांचे स्वप्न भंग होणार आहे.

सध्या अवैध मार्गाने अमेरिकेत आलेल्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठविण्याची अमेरिका तयारी करत आहे. तर जे एच 1 बी (H-1 B) व्हिसा घेऊन अमेरिकेत आले आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळण्याची वाट पाहत आहेत. त्या जोडप्यांना आशा होती की, मूल जन्माला घातल्यानंतर जन्मतः मिळणाऱ्या नागरिकतेच्या कायद्या आधारे त्या मुलाला आपोआपच जन्मतःच अमेरिकेची नागरिकता मिळेल. ज्याचा फायदा त्यांना होईल. मात्र, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे एच 1 बी व्हिसाच्या आधारे अमेरिकेत स्थायिक भारतीय जोडप्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यांच्या या निर्णयाचा चांगलाच धसका या जोडप्यांनी घेतला आहे.

आई आणि मुलाच्या जीवाला धोका; तरीही...

टेक्सास येथील प्रसुती आणि स्त्री रोगतज्ज्ञ एस जी मुक्काला (S G Mukkala) यांनी सांगितले की, मूदतपूर्व प्रसुतीने आई आणि मूल या दोघांच्या जीवाला धोका संभवू शकतो. तसेच अशाप्रकारे जन्माला आलेल्या मुलांमध्ये फेफड्यांचे आजार, श्वसनाचे आजार, जन्माच्या वेळी वजन कमी भरणे, मज्जासंस्थासंबंधीचे विकार संभवू शकतात, असे त्यांनी या जोडप्यांना समजावून सांगितले आहे. गेल्या दोन दिवसात त्यांनी 15 ते 20 जोडप्यांना त्यांनी समूपदेशन केले आहे. तरीही बाळाला 20 फेब्रुवारीपूर्वी सिझेरियनद्वारे जन्माला घालण्यासाठी दाम्पत्य आग्रही असल्याचे दिसत आहेत.

आम्ही 6 वर्षांपासून थांबलो आहोत 'हा' एकच मार्ग होता

सी-सेक्शनमध्ये धाव घेणाऱ्या एका जोडप्याने सांगितले, आम्ही अक्षरशः आमच्या बाळाच्या जन्मासाठीचे दिवस मोजत होतो. आम्ही 8 वर्षांपूर्वी एच-1 बी व्हिसावर येथे आलो होतो. गेल्या सहा वर्षांपासून आम्ही ग्रीन कार्डसाठी वाट पाहत होतो. आमच्या बाळाचा जन्म हा अमेरिकेत कायमस्वरुपी राहण्याचा एकमेव मार्ग होता. आता आम्ही अतिशय अनिश्चितेत जगत आहोत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात माझ्या बायकोची प्रसुती होणार होती.

अशा प्रकारे अनेक दाम्पत्य जे आपल्या मुलाच्या जन्माची वाट पाहत होते त्यांना ट्रम्प यांच्या या निर्णयाचा चांगलाच फटका बसणार असल्याने 20 फेब्रुवारीपूर्वी त्यांच्या बाळाचा जन्म न झाल्यास त्यांचे भविष्य काय असेल याची त्यांना चिंता लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in