‘स्पाईस रूट’वर तुर्कीये नाराज ;आमच्या परवानगीशिवाय पूर्वेकडून पश्चिमेला जाता येणार नाही

भारतातून जहाजातून जर्मनीला माल नेताना सध्या ३६ दिवस लागतात
‘स्पाईस रूट’वर तुर्कीये नाराज ;आमच्या परवानगीशिवाय पूर्वेकडून पश्चिमेला जाता येणार नाही

इस्तंबूल : भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक मार्गिका ‘स्पाईस रूट' ही ‘जी-२०’ शिखर परिषदेचे मोठे यश मानले जात आहे. मात्र, या ‘स्पाईस रूट’ला तुर्कीयेने आक्षेप घेतला आहे. आमच्या परवानगीशिवाय ही मार्गिका बनू शकत नाही, असे तुर्कीयेचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, पूर्वेकडून पश्चिमेला जाताना कोणत्याही वाहतुकीला तुर्कीयेतूनच जावे लागेल. भारत-यूएई-सौदी अरेबिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली व युरोपियन युनियनसहित ८ देशांबरोबरच या प्रकल्पाचा फायदा इस्त्राएल व जॉर्डनलाही होणार आहे.

मुंबईहून सुरू होणारी ही मार्गिका युरोपपर्यंत जाईल. ही नवीन मार्गिका चीनच्या ‘बेल्ट ॲँड रोड इनिशिएटिव्ह’ला पर्याय आहे. ही मार्गिका ६ हजार किमी लांब असून त्यात ३५०० किमीचे अंतर समुद्रातील असेल. ही मार्गिका बनल्यावर भारतातून युरोपला माल नेण्यास ४० टक्के वेळ वाचेल. सध्या भारतातून जहाजातून जर्मनीला माल नेताना सध्या ३६ दिवस लागतात, तर ही मार्गिका बनल्यावर १४ दिवसांची बचत होऊ शकेल.

logo
marathi.freepressjournal.in