इंफाळच्या आकाशात दोन संदिग्ध वस्तू दिसल्या

तीन उड्डाणांना विलंब झाला. प्राधिकरणाने परवनगी दिल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली.
इंफाळच्या आकाशात दोन संदिग्ध वस्तू दिसल्या

इंफाळ : येथील वीर टिकेंद्रजीत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या क्षेत्रात रविवार अज्ञात मानवरहित दोन संदिग्ध वस्तू दिसल्या. त्यामुळे विमानतळावरील उड्डाणे बंद करण्यात आली.

दुपारी २.३० वाजता या हवाई वाहनांची माहिती मिळाली. त्यामुळे इंफाळला येणारी - जाणारी विमानांचे उड्डाण रोखण्यात आले. मणिपूरच्या राजधानीत येणाऱ्या उड्डाणांना परत पाठवण्यात आले.

विमान सेवा स्थगित करण्याबाबत वीर टिकेंद्रजीत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक चिपेम्पी किशिंग म्हणाले की, इंफाळ नियंत्रित हवाई क्षेत्रात एक अज्ञात उडणारी वस्तू दिसली. त्यानंतर दोन विमानांना दुसरीकडे वळवण्यात आले. तर तीन उड्डाणांना विलंब झाला. प्राधिकरणाने परवनगी दिल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली.

logo
marathi.freepressjournal.in