Russia-Ukraine War: युक्रेनने रशियावर केला वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखा हल्ला, ड्रोनने दिली धडक; रशियाने डागली १०० क्षेपणास्त्रे

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या भीषण हल्ल्याची पुनरावृत्ती रशियात झाली. रशियातील सारातोव शहरातील सर्वात उंच वोल्गा स्काय कॉम्प्लेक्सवर युक्रेनने ड्रोनने हल्ला केला.
Russia-Ukraine War: युक्रेनने रशियावर केला वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखा हल्ला, ड्रोनने दिली धडक; रशियाने डागली १०० क्षेपणास्त्रे
X
Published on

मॉस्को : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या भीषण हल्ल्याची पुनरावृत्ती रशियात झाली. रशियातील सारातोव शहरातील सर्वात उंच वोल्गा स्काय कॉम्प्लेक्सवर युक्रेनने ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात कोणीही मृत पावले नाही. मात्र, या हल्ल्यामुळे रशिया चवताळला असून त्याने युक्रेनच्या विविध भागात शंभरावर ड्रोन व क्षेपणास्त्रे डागली. विशेष म्हणजे, युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले गेले. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्व, उत्तर, दक्षिण व मध्य युक्रेनमध्ये रशियन ड्रोननी हल्ले केले. त्यानंतर क्रूझ व बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

गेल्या सव्वादोन वर्षांपासून रशिया व युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. युक्रेनने सोडलेले ड्रोन रशियातील ३८ मजली इमारतीवर जाऊन धडकले. या हल्ल्यात एका महिलेसह दोन जण गंभीर जखमी झाले.

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी रशियाकडून रात्रभर सुरू असलेल्या बॉम्बफेकीचा कठोर शब्दांत निषेध केला. या हल्ल्यासाठी रशियाने १०० हून अधिक क्षेपणास्त्रे व १०० शहीद ड्रोनचा वापर केला. यात काही जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाले. रशियन हल्ल्यात युक्रेनच्या ऊर्जा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. खारकीव, कीव व ओडेसापर्यंतच्या क्षेत्राला लक्ष्य केले गेले.

logo
marathi.freepressjournal.in