भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी अमेरिकन प्रशासन देणार २६२ कोटींची नुकसानभरपाई

अमेरिकेतली सिएटल शहरात जान्हवी कंडुला या भारतीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. २३ वर्षीय जान्हवीला एका पोलीस जीपने धडक दिली होती.
भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी अमेरिकन प्रशासन देणार २६२ कोटींची नुकसानभरपाई
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेतली सिएटल शहरात जान्हवी कंडुला या भारतीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. २३ वर्षीय जान्हवीला एका पोलीस जीपने धडक दिली होती. या घटनेनंतर सिएटल प्रशासनाने जान्हवीच्या कुटुंबाला मोठी नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे. जान्हवीच्या कुटुंबाने दाखल केलेला खटला निकाली काढण्यासाठी प्रशासनाने तब्बल २९ मिलियन अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच सुमारे २६२ कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे.

जान्हवी कंडुला ही सिएटलमधील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीच्या सिएटल कॅम्पसमध्ये इन्फॉर्मेशन सिस्टम्समध्ये मास्टर्स डिग्री करत होती. जानेवारी २०२३ मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या भरधाव वेगात असलेल्या गाडीने तिला धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की जान्हवीचा जागीच मृत्यू झाला. पोलीस अधिकारी केव्हिन डेव्ह यांच्या वाहनाने जान्हवीला धडक दिली, ते एका ड्रग ओव्हरडोजच्या कॉलवर जात होते. त्यावेळी त्याची गाडी तब्बल ११९ किमी/तास वेगाने धावत होती.

logo
marathi.freepressjournal.in