संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमेरिकेतील ४० दिवसांचा शटडाऊन संपण्याची शक्यता; सिनेटने निधी विधेयक मंजूर केले

अमेरिकेतील ४० दिवसांचे सरकारी शटडाऊन संपण्याची शक्यता आहे. रविवारी अमेरिकन सिनेटने ३१ जानेवारीपर्यंत सरकारला निधी पुरवणारे निधी विधेयक मंजूर करून प्रक्रिया पुढे नेली.
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेतील ४० दिवसांचे सरकारी शटडाऊन संपण्याची शक्यता आहे. रविवारी अमेरिकन सिनेटने ३१ जानेवारीपर्यंत सरकारला निधी पुरवणारे निधी विधेयक मंजूर करून प्रक्रिया पुढे नेली.

या विधेयकामुळे एजन्सींना ३१ जानेवारीपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकता येणार नाही आणि शटडाऊनदरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देखील मिळेल. हे विधेयक ६०-४० मतांनी मंजूर झाले.

आता सिनेट त्यात सुधारणा करेल. त्यानंतर हा ठराव मंजुरीसाठी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीसाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जकडे पाठवला जाईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. शटडाऊन संपवण्याच्या बदल्यात रिपब्लिकननी काही डेमोक्रॅटिक सिनेटरना आश्वासन दिले की ते डिसेंबरच्या अखेरीस ओबामाकेअर अनुदान वाढवण्यावर मतदान करतील.

logo
marathi.freepressjournal.in