मुनीर अमेरिकेच्या 'आर्मी डे'चे पाहुणे; १४ जून रोजी परेडमध्ये होणार सहभागी

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धात आपण मध्यस्थी केल्याने युद्धबंदी झाल्याचा दावा वारंवार केल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना २५० व्या ‘आर्मी डे परेड’साठी निमंत्रण दिले आहे.
मुनीर अमेरिकेच्या 'आर्मी डे'चे पाहुणे; १४ जून रोजी परेडमध्ये होणार सहभागी
Published on

वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धात आपण मध्यस्थी केल्याने युद्धबंदी झाल्याचा दावा वारंवार केल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना २५० व्या ‘आर्मी डे परेड’साठी निमंत्रण दिले आहे.

यासाठी मुनीर हे गुरुवारी अमेरिकेत दाखल होणार असून १४ जून रोजी होणाऱ्या परेड समारंभात सहभागी होणार आहेत. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकला नामोहरम केल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मुनीर यांना दिलेले हे निमंत्रण म्हणजे ट्रम्प आपले मित्र असल्याचे म्हणवणाऱ्या पंतप्रधान मोदींना धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in