

दुबई : अमेरिकेने इराणमधील सुमारे ९० तळांवर गुरुवारी पहाटे नवे हवाई हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर देत इराणनेही आखाती देशांमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले.
इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या दोन दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून ७८ जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये बहुतांश लष्करी जवान आहेत. दुसरीकडे बहरीन, कुवेत आणि कतारमध्ये झालेल्या नुकसानीची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, होर्मुझमधील वाढत्या तणावानंतर, कुवैती कच्च्या तेलाचे २० लाख बॅरल घेऊन जाणारे भारतीय ध्वज असलेले 'लैला वादिनार' हे टँकर बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील ओमानच्या किनाऱ्यावरून परतले?