हवेतच आर्मी हेलिकॉप्टर आणि ६४ प्रवासी असलेल्या विमानाची टक्कर; अमेरिकेत भीषण अपघात, अनेकांच्या मृत्यूची भीती, Video व्हायरल

अमेरिकेच्या आकाशात हवेतच एक लष्करी हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. वॉशिंग्टन डीसीजवळील रीगन नॅशनल विमानतळावर ६४ प्रवासी असलेले विमान उतरत असताना अमेरिकेच्या लष्करी विमानाशी त्याची जोरदार टक्कर झाली. त्यानंतर हेलिकॉप्टर आणि विमान देखील पोटोमॅक नदीत कोसळले असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ...
हवेतच आर्मी हेलिकॉप्टर आणि ६४ प्रवासी असलेल्या विमानाची टक्कर; अमेरिकेत भीषण अपघात, अनेकांच्या मृत्यूची भीती, Video व्हायरल
Published on

अमेरिकेच्या आकाशात हवेतच एक लष्करी हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी रात्री (स्थानिक वेळेनुसार) वॉशिंग्टन डीसीजवळील रीगन नॅशनल विमानतळावर ६४ प्रवासी असलेले विमान उतरत असताना अमेरिकेच्या लष्करी विमानाशी त्याची जोरदार टक्कर झाली. त्यानंतर हेलिकॉप्टर आणि विमान देखील पोटोमॅक नदीत कोसळले असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओही ऑनलाइन समोर आला आहे. भीषण अपघातात किमान १९ जणांचा मृत्यू झाला असून जीवितहानी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त CRJ-700 व्यावसायिक विमान होते. ७० प्रवाशांना वाहून नेण्यास ते सक्षम होते.अपघातावेळी विमानात ६० प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. हे विमान कॅन्सासवरून वॉशिंग्टन डीसीजवळील रीगन नॅशनल एअरपोर्टकडे निघाले होते.

PSA कडून चालवण्यात येणारे अमेरिकन ईगल फ्लाईट 5342 हे विमान अपघातग्रस्त झाल्याच्या वृत्ताला अमेरिकन एअरलाइन्सने दुजोरा दिला आहे. PSA ही एक प्रादेशिक विमान कंपनी आहे जी अमेरिकन एअरलाइन्सच्या वतीने उड्डाणे चालवते. प्रवासी विमान ज्या लष्करी हेलिकॉप्टरला धडकले ते यूएस आर्मीचे ब्लॅकहॉक (H-60) हेलिकॉप्टर होते. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, विमानात तीन कर्मचारी होते आणि त्यात कोणीही व्हीआयपी व्यक्ती नव्हती.

अपघातानंतर सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. वॉशिंग्टनचे मेट्रोपॉलिटन पोलिस विभागही घटनास्थळी पोहोचले आहे. दरम्यान, या घटनेनंतर रेगन राष्ट्रीय विमानतळावर सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वप्रथम धाव घेणाऱ्यांचे आभार मानले. भीषण अपघाताबद्दल माहिती मिळाली. ईश्वर मृतांच्या आत्म्याला शांती देवो. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in