

वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय ‘पेंटागॉन’ला तत्काळ अण्वस्त्र चाचण्या करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. या चाचण्या चीन व रशियाच्या तोडीच्या झाल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
अमेरिकेने अखेरच्या अण्वस्त्र चाचण्या २३ सप्टेंबर १९९२ ला केल्या होत्या. ती अमेरिकेची १०३० वी चाचणी होती. ही चाचणी नेवाडा चाचणी केंद्रात २३०० फूट जमिनीत केली. कारण किरणोत्सर्ग बाहेर पसरू नये, हा स्फोट इतका मोठा होता की, जमिनीतील दगड वितळून गेले. तेथे अजूनही १५० मीटर लांब व १० मीटर खोल खड्डा दिसत आहे. १९९६ च्या ‘सीटीबीटी’ चाचण्याअंतर्गत भूमिगत अणुचाचण्या रोखण्यात आल्या होत्या. अमेरिका, रशिया व चीनने यासंबंधीच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
