वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्या आरोग्याच्या तक्रारीवर जगभरात विविध चर्चांना उधाण आले होते. बायडेन अनेकदा चालताना धडपडले, बोलताना अडखळले, अनेकांची नावे विसरले. त्यामुळे त्यांच्यावर आरोग्याविषयी प्रश्नचिन्हे उपस्थित केली होती. आता राष्ट्रपती एकदम ‘फिट’ असल्याचा निर्वाळा त्यांच्या डॉक्टरांनी दिला आहे. भविष्यातही ते राष्ट्रपतीपदाचे काम सांभाळू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले. ८१ वर्षीय बायडेनची मेरीलँड येथील वाल्टर रिड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरची वार्षिक आरोग्य चाचणी झाली. अडीच तास चाललेल्या या चाचणीनंतर केविन ओ'कोनो यांनी सांगितले की, बायडेन हे राष्ट्रपती म्हणून आपली जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आहेत.