अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आज होणार मतदान; कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत

जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मंगळवारी मतदान होणार आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आज होणार मतदान; कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत
Published on

वॉशिंग्टन : जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मंगळवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत आहे. या निवडणुकीसाठी २४.४ कोटी मतदार मतदान करतील.

या निवडणुकीत जिंकणारा उमेदवार अमेरिकेचा ४७ वा राष्ट्राध्यक्ष बनेल. संपूर्ण जगाचे लक्ष आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकडे लागले आहे. कारण नवीन राष्ट्राध्यक्ष आपल्या दृष्टिकोनातून परराष्ट्र धोरण तयार करेल. त्याचे परिणाम जगावर पडणार आहेत. कमला हॅरिस यांच्यासोबत उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी टिम वाल्ज, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी जे. डी. वेन्स हे निवडणूक लढवत आहेत. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत मतदान पार पडेल.

logo
marathi.freepressjournal.in