हुती बंडखोरांवर अमेरिकेचा हवाई हल्ला; ३१ जणांचा मृत्यू, १०१ जखमी

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर अमेरिकेची हुती बंडखोरांवरील ही पहिलीच कारवाई आहे.
हुती बंडखोरांवर अमेरिकेचा हवाई हल्ला; ३१ जणांचा मृत्यू, १०१ जखमी
X @KennethRakusin
Published on

साना : अमेरिकन हवाई दलाने येमेनमधील हुती बंडखोरांवर हल्ला केला. यात ३१ जणांचा मृत्यू झाला असून १०१ जण जखमी झाले.

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर अमेरिकेची हुती बंडखोरांवरील ही पहिलीच कारवाई आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, तुमचे दिवस भरले आहेत. अमेरिका तुमच्यावर आकाशातून इतकी बॉम्बफेक करेल, की तुम्ही यापूर्वी तशी पाहिली नसेल.

तांबड्या समुद्रात अमेरिकन जहाजावर हुती बंडखोरांनी हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली.

ट्रम्प यांचा इराणला इशारा

ट्रम्प म्हणाले की, हुती दहशतवाद्यांना इराण निधी पुरवठा करत आहे. हे दहशतवादी अमेरिकन विमानांवर क्षेपणास्त्र डागत आहेत. त्यामुळे अमेरिका व जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. निरपराध लोक बळी पडत आहेत. इराणने हुती बंडखोरांना समर्थन देणे बंद करावे. अमेरिका व त्याच्या राष्ट्राध्यक्षांना धमकावण्याचे प्रयत्न करू नयेत. तुम्ही हे प्रकार केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

हुतींनी केलेल्या हल्ल्याला बायडेन यांनी प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे हुती बंडखोर बिनधास्त हल्ले करत आहेत.

तांबडा समुद्र, एडनची खाडी व सुएझ कालवा येथून सुरक्षितपणे अमेरिकन जहाजे गेल्या वर्षभरापासून गेलेली नाहीत. पण, आम्ही अमेरिकन जहाजांवर हुती बंडखोरांचे हल्ले सहन करणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in