...तर शांतता करारात मध्यस्थीचे प्रयत्न सोडून देणार! रशिया-युक्रेन संघर्षाबाबत अमेरिकेचा इशारा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतरही रशिया-युक्रेन यांच्यात शांतता करार होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत नसल्याने आता अमेरिका हा शांतता करार करण्याचा प्रयत्न सोडून देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
...तर शांतता करारात मध्यस्थीचे प्रयत्न सोडून देणार! रशिया-युक्रेन संघर्षाबाबत अमेरिकेचा इशारा
X-AF Post; FPJ
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतरही रशिया-युक्रेन यांच्यात शांतता करार होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत नसल्याने आता अमेरिका हा शांतता करार करण्याचा प्रयत्न सोडून देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. यामध्ये युक्रेनच्या अनेक शहरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एवढेच नाही, तर रशिया आणि युक्रेन संघर्षाचा फटका जगभरातील देशांनाही सहन करावा लागत आहे. रशिया-युक्रेन संघर्ष थांबावा यासाठी काही दिवसांपूर्वी अमेरिकेने मध्यस्थी केली होती. यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्नही केले.

ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन संघर्ष थांबण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर फोनवरून चर्चादेखील केली होती. त्यानंतर रशियानेही होकार दर्शवला होता. त्यामुळे ट्रम्प यांची मध्यस्थी सफल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतरही रशिया-युक्रेन शांतता करार होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता अमेरिका हा शांतता करार करण्याचा प्रयत्न सोडून देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन शांतता करार होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत नसल्यामुळे पुढील काही दिवसांत ट्रम्प हे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सोडून देतील, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी शुक्रवारी सांगितले.

मार्को रुबियो यांनी म्हटले आहे की, आम्ही हे प्रयत्न अनेक आठवडे आणि महिने सुरू ठेवणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in