ओलिसांना हुडकण्यासाठी पेगासस स्पायवेअरचा वापर ?

एनएओ ग्रुप आणि कॅंडिरु या कंपन्यांना अमेरिकेने काळ्या यादीत टाकले आहे
ओलिसांना हुडकण्यासाठी पेगासस स्पायवेअरचा वापर ?

तेल अवीव: हमास अतिरेकी संघटनेकडून ओलीस ठेवलेल्या इस्त्रायली नागरिकांचा सुगावा लावण्यासाठी इस्त्रायल आता पेगासस निर्मात्या स्पायवेअर कंपनीची मदत घेणार असल्याचे समजले आहे. यासाठी वादग्रस्त एनएसओ ग्रुप आणि कॅंडीरु सह अनेक स्पायवेअर कंपन्यांना त्यांचे सॉफ्टवेअर इस्त्रायल सुरक्षा दलांना उपयोगी होर्इल अशा प्रकारे अद्ययावत करण्यास सांगण्यात आले आहे. रेझोन आणि पॅरॅगोन सह अनेक कंपन्या मोफत सेवा देण्यास सज्ज झाल्या आहेत. एनएओ ग्रुप आणि कॅंडिरु या कंपन्यांना अमेरिकेने काळ्या यादीत टाकले आहे. तरी देखील इस्त्रायलने या कंपन्यांना या कामासाठी गोवले आहे

logo
marathi.freepressjournal.in