
व्हँकूव्हर : कॅनडाच्या व्हॅंकुव्हर येथे स्ट्रिट फेस्टिव्हलदरम्यान एका भरधाव कारने जमावाला चिरडले, या अपघातात ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
शनिवारी रात्री ८ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी ८.३० वा.) ई-४३व्या अॅव्हेन्यू आणि फ्रेझर येथे एका स्ट्रिट फेस्टिव्हलमध्ये लोकांची तोबा गर्दी जमली होती. या गर्दीत कार घुसल्याने, अनेकांना जागीच प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, व्हँकूव्हरचे महापौर केन सिम यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत सांगितले की, “फिलिपिनो वारसा आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करणाऱ्या ‘लापू लापू लापू डे फेस्टिव्हल’मध्ये घडलेल्या या घटनेबद्दल दु:ख झाले.” तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेमागील हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. परंतु हा हल्ला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच अलीकडच्या काही काळात कॅनडामध्ये अशा अनेक प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. या अत्यंत कठीण काळात आमच्या संवेदना व्हँकूव्हरमधील सर्व प्रभावित लोकांसोबत आणि फिलिपिनो समुदायासोबत आहेत.”