भारतीयांना म्यानमारमध्ये पोहोचताक्षणीच व्हिसा

भारत आणि म्यानमारच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात पर्यटनाला जाण्यासाठी पर्यटक व्हिसा मिळवावा लागतो
भारतीयांना म्यानमारमध्ये पोहोचताक्षणीच व्हिसा

यांगून : शेजारच्या म्यानमार अर्थात पूर्वीच्या ब्रह्मदेशात भारतीय पर्यटकांसाठी विमानातून उतरताच ऑन अरायव्हल तत्काळ व्हिसा देण्याची घोषणा तेथील सरकारने केली आहे. देशात पूर्वीप्रमाणे पर्यटक यावेत आणि देशाची भरभराट व्हावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सुरुवातीला एक वर्षासाठी चाचणी पातळीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. लवकरच योजना सुरू होण्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

योजना सुरू झाल्यानंतर व्हिसाधारक निषिद्ध ठिकाणे सोडून संपूर्ण देशात कोणत्याही ठिकाणी जाता येणार आहे. सध्या भारत आणि म्यानमारच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात पर्यटनाला जाण्यासाठी पर्यटक व्हिसा मिळवावा लागतो. त्यासाठी ऑनलार्इन अर्ज करावा लागतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in