Vladimir Putin: रशियाचे राष्ट्रअध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका ; बेडरुमध्येच बेशूद्ध अवस्थेत आढळले

क्रेमलिन इनसायडर नावाच्या एका टेलिग्राम चॅनलने याबाबत माहिती दिली आहे.
Vladimir Putin: रशियाचे राष्ट्रअध्यक्ष  व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका ; बेडरुमध्येच बेशूद्ध अवस्थेत आढळले

रशियाचे राष्ट्रअध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुतिन यांना कार्डिएक अरेस्ट येऊत ते रुममध्ये कोसळले असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. क्रेमलिन इनसायडर नावाच्या एका टेलिग्राम चॅनलने याबाबत माहिती दिली आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, एका सुरक्षा कर्मचाऱ्याला पुतिन बेडरुममध्ये बेशुद्ध आवस्थेत आढळले.

पुतिन बेडरुमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. ही घटना २२ ऑक्टोंबर रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे. पुतिन यांना त्यांच्या निवासस्थानी असलेल्या एका विशेष सुविधा असलेल्या आयसीयूमध्ये हलवण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. क्रेमलिनच्या एका माजी अधिकाऱ्याच्या टेलिग्राम चॅनलने याबाबतची माहिती दिली आहे. रविवारी संध्याकाळी ही मॉस्को येथील खासगी अपार्टमेंटमध्ये असताना पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं टेलिग्राम चॅनलच्या हवाल्याने सांगितलंच जात आहे.

याच टेलिग्राम चॅनलने पुतिन यांच्या आरोग्याबाबत असंच अपडेट्सं दिले होते. ज्यापैकी अनेक चुकीचे सिद्ध झालं आहे. टेलिग्राम चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, रविवार(२२

ऑक्टोबर) रोजी पुतिन यांना कार्डिएक अरेस्ट आल्याचं सांगितलं. दरम्यान, पुतिन यांच्या तब्येतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर मात्र चर्चेला उधान आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in