भारतात अनेक सिंगापूर बनवण्याची इच्छा - मोदी

सिंगापूर हा भारतासाठी सहकारी देश नाही तर प्रत्येक विकसनशील देशासाठी प्रेरणा देणारा देश आहे. भारतात आम्हीही अनेक सिंगापूर बनवू इच्छितो.
भारतात अनेक सिंगापूर बनवण्याची इच्छा - मोदी
@narendramodi/ X
Published on

सिंगापूर : सिंगापूर हा भारतासाठी सहकारी देश नाही तर प्रत्येक विकसनशील देशासाठी प्रेरणा देणारा देश आहे. भारतात आम्हीही अनेक सिंगापूर बनवू इच्छितो.

आपण या दिशेने एकत्र येऊन प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. सिंगापूरच्या संसदेत गुरुवारी पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांनी त्यांचे स्वागत केले. भारत आणि सिंगापूरने सेमीकंडक्टर, डिजिटल टेक्नोलॉजी, आरोग्य सहकार्य व कौशल्य विकास आदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार, दोन्ही देश सेमीकंडक्टर, क्लस्टर डेव्हलपमेंट, सेमीकंडक्टर डिझायनिंग व उत्पादनावर लक्ष केंद्रित करणार आहेत. या करारांतर्गत भारत व सिंगापूर डिजिटल तंत्रज्ञानाबाबत एकमेकांना सहकार्य करतील.

logo
marathi.freepressjournal.in