आम्हाला डोनाल्ड ट्रम्पला मारायचे आहे, 'या' देशाने केले वक्तव्य

इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या क्षेपणास्त्र शस्त्रागारात 1,650 किमी पल्ला असलेले नवीन क्रूझ क्षेपणास्त्र जोडले गेले
आम्हाला डोनाल्ड ट्रम्पला मारायचे आहे, 'या' देशाने केले वक्तव्य

अमेरिका आणि इराणमधील ताणले गेलेले संबंध एव्हाना सर्वश्रुत आहेत. दरम्यान, इराणने 1,650 किमी पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्र तयार केले आहे. युक्रेन युद्धात रशियाने इराणच्या ड्रोनचा वापर केल्यानंतर या क्षेपणास्त्रामुळे पाश्चात्य देशांमध्ये चिंता वाढू शकते. एवढेच नाही तर रिव्होल्युशनरी गार्ड्स एरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमीरअली हाजीजादेह यांनीही अमेरिकेला सर्वोच्च कमांडरच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. आम्हाला डोनाल्ड ट्रम्पला मारायचे आहे, असे हाजीजादेह यांनी म्हटले आहे. 

एका माध्यम वाहिनीवर बोलताना ते म्हणाले की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या क्षेपणास्त्र शस्त्रागारात 1,650 किमी पल्ला असलेले नवीन क्रूझ क्षेपणास्त्र जोडले गेले आहे. याशिवाय या क्षेपणास्त्राचे फुटेजही प्रथमच दाखविण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इराणच्या कमांडरने दावा केला होता की देशाने हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in