कोण आहेत 'तुलसी गबार्ड'? पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेतल्यानंतर होत आहे त्यांच्या नावाची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि.१३) सकाळी वॉशिंग्टन डीसी येथे पोहोचले. विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अमेरिका दौऱ्यातील या भेटीत मोदी यांनी सर्वप्रथम अमेरिकेच्या राष्ट्रीय इंटेलिजन्स डायरेक्टर (Director of National Intelligence - DNI) 'तुलसी गबार्ड' (Tulsi Gabbard) यांची भेट घेतली.
कोण आहेत 'तुलसी गबार्ड'? पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या नावाची होत आहे चर्चा
कोण आहेत 'तुलसी गबार्ड'? पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या नावाची होत आहे चर्चा@narendramodi
Published on

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेला हा पहिलाच दौरा आहे. भारतीय वेळेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि.१३) सकाळी वॉशिंग्टन डीसी येथे पोहोचले. विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अमेरिका दौऱ्यातील या भेटीत मोदी यांनी सर्वप्रथम अमेरिकेच्या राष्ट्रीय इंटेलिजन्स डायरेक्टर (Director of National Intelligence - DNI) 'तुलसी गबार्ड' (Tulsi Gabbard) यांची भेट घेतली.

'तुलसी गबार्ड' यांची काल बुधवारी (दि.१२) अमेरिकेच्या राष्ट्रीय इंटेलिजन्स डायरेक्टर (Director of National Intelligence - DNI) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकन सिनेटने त्यांच्या बाजूने मतदान करून त्यांची निवड केली आहे. यासोबतच त्या अमेरिकेच्या १८ इंटेलिजन्स एजन्सीच्या प्रमुख बनल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन डीसी येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम 'तुलसी गबार्ड' यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. मोदी आणि गबार्ड यांच्यात काउंटर दहशतवाद, सायबर सेक्युरिटी इत्यादी विषयांवर परस्पर सहकार्य वाढवण्याविषयी चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियापोस्टवर या भेटीविषयी लिहिले आहे, ''वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेच्या राष्ट्रीय इंटेलिजन्स डायरेक्टर Director of National Intelligence (DNI) यांची भेट घेतली. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारत-अमेरिका मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा केली. भारत अमेरिका मैत्रीबाबत त्या नेहमीच एक मजबूत समर्थक राहिल्या आहेत.''

कोण आहेत 'तुलसी गबार्ड'?

मोदींच्या भेटीनंतर सध्या 'तुलसी गबार्ड' यांच्या विषयी मोठी चर्चा सुरू आहे. त्याचे कारण आहे त्यांचे प्रथम नाव. 'तुलसी' हे नाव भारतीय असल्याने त्या भारतीय वंशाच्या आहेत का हा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, 'तुलसी' या भारतीय वंशाच्या नाहीत, अशी माहिती समोर आल्यानंतर त्यांचे नाव 'तुलसी' का आहे याविषयी अनेकांना प्रश्न पडला आहे.

'FirstPost' च्या माहितीनुसार, 'तुलसी' यांचा जन्म अमेरिकेच्या सामोआ प्रदेशात झाला होता आणि बालपणाचा काही काळ हवाई आणि फिलीपिन्समध्ये गेला.

त्यांनी तरुण वयात राजकारणात प्रवेश केला आणि अवघ्या २१ व्या वर्षी हवाईच्या प्रतिनिधी सभागृहात जागा जिंकली. तथापि, एका टर्मनंतर त्यांची राजकीय कारकीर्द थांबली होती. मात्र, नंतर गबार्ड यांनी पुन्हा पुनरागमन केले आणि हवाईचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी काँग्रेसमध्ये जागा मिळवली. तसेच अमेरिकेच्या सभागृहात भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणाऱ्या पहिल्या हिंदू सदस्या म्हणून त्यांनी इतिहास रचला. तसेच त्या काँग्रेसमध्ये निवडून आलेल्या पहिल्या अमेरिकन सामोअन देखील होत्या.

काय आहे 'तुलसी' या हिंदू नावासोबतचे कनेक्शन

'तुलसी' यांच्या आईने हिंदू धर्म स्वीकारला आणि त्यांनी त्यांच्या सर्व मुलांना हिंदू नावे दिली. त्यामुळे त्यांचे नाव 'तुलसी' आहे, असे 'FirstPost' ने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in