रशियाचा आक्रमकपणा थंडावणार? रशियाकडे १४ दिवस पुरेल इतकाच दारुगोळा


रशियाचा आक्रमकपणा थंडावणार? 
रशियाकडे १४ दिवस पुरेल इतकाच दारुगोळा

रशिया आणि युक्रेन युद्ध २० व्या दिवशीही सुरूच आहे. मात्र, रशियाकडे आता केवळ १० ते १४ दिवस पुरेल इतकाच दारुगोळ्याचा साठा उरल्याचे ब्रिटनच्या गुप्तचर सूत्रांनी म्हटले आहे.

रशियाने चीनकडून सैन्य मदतीच्या रुपात हत्यारे आणि ड्रोन विमानांची मागणी केल्याच्या काही बातम्या नुकत्याच समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या गुप्तचरांचा दावा अतिशय महत्त्वाचा ठरत आहे.

दारुगोळा संपुष्टात येत असल्याने रशियाला युद्धाच्या मैदानात युक्रेनशी दोन हात करण्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इतकंच नाही तर युक्रेनच्या ज्या भागांवर रशियाने ताबा मिळवलाय तो कायम ठेवणेही रशियन लष्कराला जड जाताना दिसून येत आहे. याचदरम्यान अमेरिकन अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, रशियाकडून जमिनीवर केला जाणारा हल्ला जवळपास थांबला आहे.

८० विमाने पाडल्याचा झेलेन्स्कींचा दावा

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाची ८० लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. ही संख्या लवकरच शेकडोंमध्ये पोहचेल. तसेच रशियन सैन्याचे शेकडो टँक आणि हजारो उपकरणेही नष्ट झाल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.