वाढत्या कोरोनामुळे देशात कोरोनाच्या छोट्या लाटा येणार ?

दर चार ते सहा महिन्यांनी कोरोनाच्या अशा लहान लाटा येऊ शकतात
वाढत्या कोरोनामुळे देशात कोरोनाच्या छोट्या लाटा येणार ?

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांत अटोक्यात आलेला हा कोरोना परत डोके वर काढताना दिसत आहे. या वाढत्या कोरोनामुळे देशात पुन्हा कोरोनाच्या छोट्या लाटा येऊ शकतात, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.

देशात नव्या रूपातील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या नव्या कोरोनाचे रूप ओमायक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक आहे. या कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. तसेच दर चार ते सहा महिन्यांनी कोरोनाच्या अशा लहान लाटा येऊ शकतात, असेही स्वामीनाथन म्हणाल्या. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासोबतच या नव्या कोरोनाचा शोध घेणेही महत्त्वाचे असल्याचे मत स्वामीनाथन यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in