इराणमध्ये महिलांना फुटबॉल सामने पाहण्याची परवानगी

पार्श्वभूमीवर महिलांना ही सूट देण्यात आली
इराणमध्ये महिलांना फुटबॉल सामने पाहण्याची परवानगी

तेहरान : इराणमध्ये महिलांना स्टेडियममध्ये जाऊन फुटबॉल सामने पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

इराणमध्ये १९७९ साली इस्लामिक क्रांती झाल्यापासून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी वावरण्यावर बंधने आणली होती. महिलांना फुटबॉल सामने पाहण्यास मज्जाव करणारा कोणताही कायदा अस्तित्वात नसला तरी देशातील कट्टर इस्लामी मुल्ला-मौलवींनी त्यावर बंदी आणली होती. अर्धनग्न किंवा तोकड्या कपड्यातील खेळाडूंना महिलांनी सार्वजनिकरीत्या पाहणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, यापुढे महिलांना स्टेडियममध्ये जाऊन फुटबॉल सामने पाहण्याची परवानगी दिली असल्याचे इराणच्या फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष मेहदी ताज यांनी जाहीर केले. इराणमधील सर्वोच्च पातळीवरील साखळी फुटबॉल सामने पुढील महिन्यात सुरू होत आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर महिलांना ही सूट देण्यात आली आहे. यापूर्वी खूप कमी वेळा महिलांना ही सवलत मिळाली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in