मायक्रोसॉफ्टकडून वर्ल्डपॅड बंद

मायक्रोसॉफ्टच्या विंडोज १२ चे अनावरण २०२४ मध्ये होऊ शकते
मायक्रोसॉफ्टकडून वर्ल्डपॅड बंद

सॅनफ्रान्सिस्को : पत्र टाइप करायला, मजकूर लिहायला जगभरात लोक बिनधास्तपणे मायक्रोसॉफ्टचे वर्ल्डपॅड हे सॉफ्टवेअर वापरत होते. गेल्या दोन पिढ्या या वर्ल्डपॅडवर वाढल्या व शिकल्या. आता हे लोकप्रिय सॉफ्टवेअर बंद करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. नवीन विंडोजमध्ये वर्ल्डपॅड नसेल.

विंडोज १२ आल्यानंतर ‘वर्ल्डपॅड’ बंद केले जाईल. त्याऐवजी एमएस वर्ल्ड मिळेल. मात्र, त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. वर्ल्डपॅड हे मोफत होते. मात्र, दीर्घकाळ त्यात सुधारणा केली नव्हती. वर्ल्डपॅड बंद होणार याचा अर्थ तुम्ही ते वापरू शकत नाही, असे नाही. मात्र, याची सुधारित आवृत्ती तुम्हाला मिळणार नाही. वर्ल्डपॅड बंद झाल्यानंतर वापरकर्त्यांकडे एमएस वर्ल्ड व नोटपॅड हे दोनच पर्याय राहतील.

काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टने ‘नोटपॅड’ची नवीन आवृत्ती आणली. यात नोटपॅडसोबत ऑटोसेव फीचर आणले आहे. मायक्रोसॉफ्ट आपल्या उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवत आहे. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज १२ चे अनावरण २०२४ मध्ये होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in