जगातील सर्वात महाग पिसाचा झाला लिलाव, नामशेष झालेल्या 'या' पक्ष्याच्या एका पिसाची किंमत तब्बल...

या पक्ष्याचे शेवटचे दर्शन १९०७ मध्ये झाले होते. त्याच्या पिसाला सुरुवातीला ३००० डॉलर्स मिळण्याची अपेक्षा होती. मात्र...
जगातील सर्वात महाग पिसाचा झाला लिलाव, नामशेष झालेल्या 'या' पक्ष्याच्या एका पिसाची किंमत तब्बल...
छायाचित्र सौजन्य - वेब्स ऑक्शन हाऊस Webb’s Auction House
Published on

लंडन : न्यूझीलंडमधील आता नामशेष झालेल्या हुइया पक्ष्याच्या एका पिसाचा लिलाव झाला असून त्याला तब्बल ४६,५२१ न्यूझीलंड डॉलर्सची (२८,४१७ अमेरिकी डॉलर्स) किंमत मिळाली आहे. अशा प्रकारे लिलाव झालेले हे आजवरचे जगातील सर्वांत महाग पीस ठरले आहे.

वेब्स ऑक्शन हाऊसकडून त्याचा लिलाव आयोजित करण्यात आला. या पिसाला सुरुवातीला ३००० डॉलर्स मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्याने त्याच प्रजातीच्या पिसासाठीचा पूर्वीचा विक्रम ४५० टक्क्यांनी मोडला, असे वेब्स ऑक्शन हाऊसच्या डेकोरेटिव्ह आर्ट्सच्या प्रमुख लेआ मॉरिस यांनी सांगितले.

हुइया हा न्यूझीलंडमधील वॅटलबर्ड वर्गातील एक लहान गाणारा पक्षी होता आणि त्याच्या सुंदर पिसाऱ्याकरिता ओळखला जात होता. हुइया पक्षी न्यूझीलंडमधील माओरी लोकांसाठी पवित्र होता. त्याची पिसे अनेकदा टोळी प्रमुख आणि त्यांचे कुटुंबीय मुकुटात परिधान परिधान करत. त्यांचा भेटवस्तू म्हणून किंवा व्यापारासाठीदेखील वापर होत होता. या पक्ष्याचे शेवटचे दर्शन १९०७ मध्ये झाले होते. ही प्रजाती तिच्या बेसुमार कत्तलीमुळे ती नष्ट झाली. हुइया पक्ष्याच्या उदाहरणावरून आपण अन्य वन्यजिवांच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत जागरूक बनू, अशी अपेक्षा लेआ मॉरिस यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in