वॉशिंग्टन : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ने (माजी ट्विटर) नवीन सेवा सुरू केली आहे. या माध्यमाद्वारे कंपनी नोकऱ्यांची माहिती देणार आहे. कंपन्या ‘एक्स’च्या प्लॅटफॉर्मवर नोकऱ्यांची माहिती देऊ शकतील. यामुळे लोकांना नोकरी मिळण्यात व कंपन्या कर्मचारी मिळण्यास मदत मिळेल. ‘एक्स’च्या नवीन घोषणेमुळे ‘लिंकडिन’ला आव्हान उभे राहणार आहे.
या नवीन सेवेचा लाभ केवळ वेरिफाईड कंपन्या उचलू शकतील. ज्या कंपन्यांना ‘ट्विटर’चे व्हेरिफाईड कंपन्यांचे सब्सक्रिप्शन मिळाले आहे, त्यांना याचा लाभ घेता येईल. या कंपन्या ‘एक्स हायरिंग बीटा प्रोग्राम’साठी साईनअप करू शकतात.
कोणत्याही कंपनीला ‘एक्स’वर वेरिफाईड कंपनीचा टॅग हवा असल्यास कंपनीचे सब्सक्रिप्शन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना दरमहा ८२३०० रुपये शुल्क आकारले जाते.