जिनपिंग जी २० ला येणार नाहीत चीनने अधिकृतरीत्या दिले पत्र

जिनपिंग जी २० ला येणार नाहीत चीनने अधिकृतरीत्या दिले पत्र

जिनपिंग का येणार नाहीत, हे मात्र चीनने स्पष्ट केलेले नाही

बीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे दिल्लीत ९ व १० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होत असलेल्या जी २० परिषदेला येणार नाहीत, असे चीनने अधिकृतरीत्या कळवले आहे. चीनचे पंतप्रधान ली क्वांग हे परिषदेला हजेरी लावतील, असे चीनने कळवले आहे. चीनने भारताच्या लडाखमधील अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशात केलेल्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जी २० परिषदेत चर्चा होईल, या शंकेने जिनपिंग यांनी भारतात येणे टाळल्याचे स्पष्ट झाले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले की, भारत सरकारने दिलेल्या निमंत्रणाला अनुसरून पंतप्रधान ली क्वांग हे नवी दिल्लीत होणाऱ्या १८ व्या जी २० परिषदेला हजेरी लावतील. चीनच्या अधिकाऱ्यांनी हे अधिकृत निवेदन भारतातील आपल्या राजदूतांना २ सप्टेंबर रोजी पाठवले आहे. यामध्ये त्यांनी शी जिनपिंग हे नवी दिल्लीतील जी २० बैठकीला हजेरी लावणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. जिनपिंग का येणार नाहीत, हे मात्र चीनने स्पष्ट केलेले नाही.

दरम्यान, शी जिनपिंग यांच्या गैरहजेरीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी खंत व्यक्त केली आहे. बायडन हे या परिषदेसाठी भारतात येणार असून ७ ते १० सप्टेंबर या काळात ते भारताच्या दौऱ्यावर असणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in