यासीन मलिकने दिली गुन्ह्यांची कबुली काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग

यासीन मलिकने दिली गुन्ह्यांची कबुली काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मोहम्मद यासिन मलिकने दिल्ली एनआयए कोर्टात दहशतवादाशी संबंधित सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मलिक याच्यावर दिल्ली उच्च न्यायालयात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) यासह दहशतवादाशी संबंधित अनेक खटले दाखल आहेत. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह या प्रकरणावर १९ मे रोजी सुनावणी घेणार आहेत.

आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणार नसल्याचेही मलिकने स्पष्ट केले आहे. मलिकवर भारतीय दंड संहितेच्या कलम १६ (दहशतवाद कायदा), कलम १७ (दहशतवादासाठी निधी), कलम १८ (दहशतवादाचा कट रचणे) आणि कलम २० (दहशतवादी टोळीचा सदस्य) असे आरोप ठेवण्यात आले आहेत. यासोबतच त्याच्यावर यूएपीए, १२०बी (गुन्हेगारी कट) आणि १२४ ए (देशद्रोह) अंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत.

विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह १९ मे रोजी यासिन मलिकच्या गुन्ह्याची शिक्षा सुनावणार आहेत. या प्रकरणांमध्ये मलिकला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, विशेष न्यायालयाने काश्मिरी फुटीरतावादी फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद बट, जहूर अहमद यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. शाह वाटाली, शाबीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवल किशोर कपूर यांच्याविरुद्ध औपचारिकपणे आरोपपत्रे तयार करण्यात आली आहेत. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी म्होरक्या हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा सय्यद सलाहुद्दीन यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.