रशियातील खासगी सैन्य असलेल्या वॅग्नर आर्मीने बंड पुकारल्याने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांना धक्काच बसला. वॅग्नर गट हा रशिया युक्रेन युद्धादरम्यान चर्चेत आला होता. पुतीन यांच्या संमतीनेच या खासगी सैन्याची स्थापना करण्यात आली होती. या सैन्याने ऐन वाईट काळात रशियाला धोका दिला असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. वॅग्नर या खासगी सैन्याचा प्रमुख येवेनगी प्रिगोझिन हा पुतीन यांचा निकटवर्तीय समजला जातो. त्यानेच पाठीत खंजीर खुपसला असल्याचं देखील पुतीन यांनी म्हटलं आहे. युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की यांनी या सर्व घटनेवर वक्तव्य केलं आहे. रशियाच्या हुकुमशाही सरकारसमोर आता मोठा धोका निर्माण झाला असून वॅग्नर या खासगी सैन्याच्या बंडखोरीमुळे पुतीन खूप घाबरले असल्याचं झेलेस्की यांनी म्हटलं आहे.
झेलेन्स्की यांनी ट्विक करत वॅग्नर सैन्याने पुकारलेल्या बंडाला स्वत: पुतीन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसंच पुतीन यांनीच स्वत:वर ही परिस्थिती ओढावून घेतली असून ते आता घाबरले असल्याचं झेलेन्स्की म्हणाले आहेत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनवासियांना संबोधित करताना म्हटलं की, रशियाचे राष्ट्रपीत पुतीन यांनी 2021 साली कशाप्रकारे जगाला धमकी दिली होती. 2022 साली त्यांनी देशाच्या लोकांचे कान भरुन त्यांचा पाठिंबा मिळवला होता. आता क्रेमलिनमध्ये राहुन ते कोणत्याही प्रकारच्या दहशतवाद्यांची मदत घेऊ शकतात. तसंच कोणताही मुर्खासारखा निर्णय घेऊ शकतात. तरीही पुतीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतं नाही आणि हिच त्यांच्यासमोरील सर्वात मोठी समस्या आहे.
याविषयी बोलताना झेलेन्स्की पुढे म्हणाले की, पुतीन यांच्या आदेशाने रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला होता. यात एकाच दिवसात युक्रेनमधील लाखो लोक मारले गेले. रशियाने खासगी भाडोत्री सैन्याचा वापर केल्याने हे सर्व झालं. युक्रेनच्या खासगी सैन्याने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा वापरप करुन युक्रेनमध्ये दहशत निर्माण केली होती. आता याच भाडोत्री सैनिकांनी रशियामध्येच खळबळ माजवली असून पूर्ण जग हे दृश्य बघत असल्याचं झेलेन्स्की म्हणाले.
क्रेमलिनमधील यो व्यक्ती आता प्रचंड घाबरलेला असून कुठेतही लपून बसल्याचं म्हणत त्यांनी पुतीन यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच त्यांनी स्वत:च स्वत:वर धोका ओढवून घेतल्याचं झेलन्स्की म्हणाले आहेत.
यावेळी झेलेन्स्की यांनी जागाला आव्हाने केलं आले. जगाने रशियाने माजवलेल्या अराजकतेला शांतपणे सामोरं जाऊ नये, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी जागतिक पातळीवरील नेत्यांनी घेतलेले निर्णय ऐतिहासिक ठरु शकतात आणि पत्रकारांनी लिहिलेला प्रत्येक शब्द सोन्यासारखा असल्याचं झेलेन्स्की म्हणाले आहेत. तसंच युक्रेवर आलेल्या संकटाला जबाबदार असणाऱ्या पुतीन यांचं नाव उघडपणे घेण्याची वेळ आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.