लहान बाळ बोलत नाही? लवकर शब्द फुटण्यासाठी 'हे' करा उपाय...

सर्व पालकांना त्यांचे लहान बाळ बोलण्याची उत्सुकता असते. आपल्या बाळाच्या तोंडातून आपल्यासाठी कधी एकदा शब्द येईल यासाठी सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात.
लहान बाळ बोलत नाही? लवकर शब्द फुटण्यासाठी 'हे' करा उपाय...
फोटो सौ : FPJ
Published on

सर्व पालकांना त्यांचे लहान बाळ कधी बोलायला लागणार याची उत्सुकता असते. आपल्या बाळाच्या तोंडातून पडणारा पहिला शब्द ऐकण्यासाठी घरातील सर्वच जण आतुर असतात. काही मुलं ज्या वयात बोलायला पाहिजे त्याच वयात बोलतात. पण, काही लहान मुलं मात्र बोलण्यासाठी बराच उशीर लावतात. आपले लहान बाळ जर २ वर्षाचे झाले आणि बोलत नसेल तर प्रत्येक पालकांना त्याची काळजी लागलेली असते. तुमच्या बाळाला बोलके करण्यासाठी व या समस्येवर तोडगा म्हणून या लेखात काही उपाय दिलेले आहे ते नक्की वाचा...

फोटो सौ : free Pik

लहान मुलांसाठी खेळ हा एक महत्त्वाचा भाग आहे. खेळामुळे संवादाची कौशल्ये तयार होतात. प्रत्येक खेळामध्ये काही ना काही संवादाचा भाग असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलासोबत वेळ काढा आणि त्याची आवड ओळखून त्यानुसार त्याच्यासोबत बोला, त्याला बोलके करा यामुळे त्याला शब्द उच्चार करण्याची सवय लागेल.

फोटो सौ : free Pik

लहान मुलांना आवडणारे साधे साधे शब्द किंवा वस्तू उदा. फळे, फुले, प्राणी, याविषयी बोला, त्यांच्या समोर त्यांना आवडणाऱ्या गोष्टींचे वाचन करा जेणेकरून त्यांना ऐकायला आवडेल, त्यांचे लक्ष्य एका ठिकाणी केंद्रित होण्यास मदत होईल यामुळे देखील मोठा फरक पडू शकतो.

फोटो सौ : free Pik

तुमच्या मुलाच्या बुद्धीच्या विकासासाठी त्याला दुसऱ्या लहान मुलांसोबत खेळु द्या. मुलाला रोजच्या कामामध्ये सहभागी करून घ्या. जेवण करणं, फिरायला जाणं या साध्या रोजच्या कामामध्ये भरपूर शिकायला मिळेल. नेहमीप्रमाणे आपले शब्द वापरा, उदा. पाणी पिऊ, झोपू चला, या प्रकारे मुलाला शब्दांची ओळख होईल.

फोटो सौ : free Pik

लहान मुलाला बोलायला शिकवण्यासाठी त्याला विविध गोष्टी शिकवणं महत्त्वाचं आहे. मुलाला वयाच्या पहिल्या काही महिन्यांपासून शब्दांची ओळख करुन द्यावी लागते. त्यासाठी, त्याच्याशी संवाद साधणं खूप गरजेचे आहे. तसेच वैद्यकीय सल्यानुसार तुमच्या मुलांना बोलण्यासाठी एखादा प्ले ग्रूप जॉइन करा. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य वेळीच स्पीच थेरपी देखील उत्तम पर्याय आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in