Aadhaar Card: तुमचे आधार कार्ड खरे आहे की बनावट? UIDAI ने सांगितली सोपी पद्धत; घरबसल्या काही मिनिटांत करा चेक

सध्याच्या काळात आधार कार्ड हे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँक खाते उघडण्यासाठी, नोकरीसाठी, ओळख पडताळणीसाठी, शाळा किंवा कॉलेजच्या प्रवेशप्रक्रियेसाठी तसेच इतर आर्थिक व्यवहारांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे.
Aadhaar Card: तुमचे आधार कार्ड खरे आहे की बनावट? UIDAI ने सांगितली सोपी पद्धत; घरबसल्या काही मिनिटांत करा चेक
Published on

सध्याच्या काळात आधार कार्ड हे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँक खाते उघडण्यासाठी, नोकरीसाठी, ओळख पडताळणीसाठी, शाळा किंवा कॉलेजच्या प्रवेशप्रक्रियेसाठी तसेच इतर आर्थिक व्यवहारांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात बनावट आधार कार्डांचा वापर करून फसवणूक करण्याचे प्रकार झपाट्याने वाढत आहेत. जर एखाद्या व्यक्तीच्या बनावट आधार कार्डचा वापर केला गेला तर त्या व्यक्तीला मोठ्या अडचणी आणि आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आधार कार्ड खरे आहे की बनावट,याची पडताळणी करणे प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक झाले आहे.

बनावट आधार कार्डमध्ये विचित्र फॉन्ट, चुकीचे QR कोड किंवा चुकीचे क्रमांक असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) लोकांना स्वतःचे आधार कार्ड खरे आहे की बनवाट याची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.

आधार कार्ड बनावट आहे हे कसे चेक कराल?

  • सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा.

  • येथे तुम्हाला होम पेजवर My Aadhaar चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • यानंतर, आधार सेवा पर्यायावर जा. Verify Aadhaar Number पर्यायवर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल.

  • त्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा.

  • जर आधार खरे असेल तर त्याच्याशी संबंधित सर्व तपशील तुम्हाला स्क्रीनवर दिसतील.

UIDAI नुसार, तुमचे आधार कार्ड पडताळण्याचा सर्वात सोपा आणि विश्वासार्ह मार्ग म्हणजे QR कोड स्कॅन करणे. प्रत्येक आधार कार्ड QR कोडसह येतो. या QR कोडमध्ये आधार धारकाचे नाव, फोटो आणि जन्मतारीख यासारखे महत्वाची माहिती एन्क्रिप्टेड असते. जेव्हा तुम्ही UIDAI च्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटचा वापर करून ते स्कॅन करता तेव्हा तुमच्या कार्डवर छापलेली माहिती स्क्रीनवर दिसते.जर माहिती जुळत नसेल किंवा QR कोड वाचता येत नसेल तर ते बनावट आधार कार्ड आहे. यासाठी तुम्ही "mAadhaar" अॅप डाउनलोड करू शकता किंवा UIDAI वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या QR कोड स्कॅनरचा वापर करू शकता. आधार कार्ड पडताळणीची ही सुविधा सर्वांसाठी मोफत आहे.

logo
marathi.freepressjournal.in