आजची दुर्गा : रस्त्यावरील मुलांसाठी काम करण्याची इच्छा; सनदी अधिकारी बनण्याचे प्रयत्न

कधी सिनेदिग्दर्शन, तर कधी कॉलेजमध्ये अंशकालीन नोकरी करीत स्वतःच स्वतःला घडविणाऱ्या नजमा खातून यांनी आपल्यावर ओढावलेली परिस्थिती समाजातील निराधार मुलांवर येऊ नये यासाठी सनदी अधिकारी होऊन रस्त्यावर जगणाऱ्या मुलांच्या आयुष्याला दिशा देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
आजची दुर्गा : रस्त्यावरील मुलांसाठी काम करण्याची इच्छा; सनदी अधिकारी बनण्याचे प्रयत्न
Published on

आजची दुर्गा - नजमा खातून

गायत्री पाठक-पटवर्धन/पुणे

कधी सिनेदिग्दर्शन, तर कधी कॉलेजमध्ये अंशकालीन नोकरी करीत स्वतःच स्वतःला घडविणाऱ्या नजमा खातून यांनी आपल्यावर ओढावलेली परिस्थिती समाजातील निराधार मुलांवर येऊ नये यासाठी सनदी अधिकारी होऊन रस्त्यावर जगणाऱ्या मुलांच्या आयुष्याला दिशा देण्याचा मानस व्यक्त केला आहे.

नजमा तिच्या पाच भावंडामध्ये शेंडेफळ. चार मोठे भाऊ आणि एक मोठी बहीण आणि आई असा परिवार तिची आई कसाबसा चालवायची. नजमाच्या आईने मोठ्या भावंडांना मदरशात शिकायला पाठवले आणि नजमा व मोठी बहीण आई जवळ राहत.

नजमा म्हणते, 'मी अगदीच ४-६ वर्षांची होते. माझी बहीण माझ्यापेक्षा ६-७ वर्षांनी मोठी, पण दिसायला सुंदर होती. याची काळजी सतत आईला असायची. ताईचे लहान वयातच एका मुलाशी प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे आईने त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर लगेच शिकायला पाठवले आणि नजमा व मोठी बहीण आई जवळ राहत.

नजमा म्हणते, 'मी अगदीच ४-६ वर्षांची होते. माझी बहीण माझ्यापेक्षा ६-७ वर्षांनी मोठी, पण दिसायला सुंदर होती. याची काळजी सतत आईला असायची. ताईचे लहान वयातच एका मुलाशी प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे आईने त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर लगेच कळलं की तो मुलगा अजिबातच चांगला नाही. मुलीला खूप त्रास देतोय, म्हणून आईने तिला घरी आणले. याचा राग मनात धरून त्या मुलाने आईचा खून केला. त्या मुलाला शिक्षा झाली, पण तो लगेचच जामिनावर सुटला. आम्ही दोघी पोरक्या झालो होतो आणि असुरक्षितही. आम्हाला सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी शेवटी एका ओळखीतून बंगालमध्ये सुरू असलेल्या रेम्बो होममध्ये पाठवले गेले. रेम्बो होम ही रस्त्यावर सापडलेल्या मुलांना तात्पुरता आधार मिळवून देणारी, त्यांचे संपूर्ण शिक्षण करणारी संस्था होती. त्यामुळे मी व माझी बहीण तिकडेच शिकत होतो. मध्यंतरीच्या काळात बहिणीचे पुन्हा लग्न झाले आणि मी शिक्षण घेत होते. नजमा १२ वीनंतर घरी जायची तेव्हा आपल्याला कुटुंबात एकूण किती भाऊ आहेत हे समजले. इतक्या वर्षांनी आपले कुटुंब एकत्रित येतेय हा नजमाला आनंद होता. पण भावाभावांमध्ये माझ्या लग्नाबाबत चर्चा चालायची. माझेही लग्न लावून द्यावे ही त्यांची इच्छा होती. तेव्हापासून मी कधीच घरी गेले नाही. मला पुढे शिकायचे होते. नजमाने रेम्बो संस्थेच्या मदतीने मीडिया अँड टेलिव्हिजनमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले. ते शिक्षण पूर्ण करतानाचा तिला दाक्षिणात्य सिनेमात सहाय्यक दिग्दर्शकाचे काम मिळाले. यानंतर 'बिफोर यू डाय', 'कुसुम का विवाह' असे दोन चांगल्या बॅनरचा बॉलिवूड सिनेमा आणि शॉर्ट फिल्ममध्येही तिला सहाय्यक दिग्दर्शकाचे काम करता आले. पटकथा, संवाद लेखन या सगळ्या विषयात ती पारंगत असल्याने तिलाही सिनेमाच्या ऑफर येऊ लागल्या. एकीकडे दिग्दर्शनाचे काम करताना दुसरीकडे स्वतःच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी ती स्वतःच्या कॉलेजमध्ये पार्टटाइम नोकरी करायची. कारण दिग्दर्शनाचे मिळणारे पैसे तसे तुटपुंजे होते.

नजमाचे फिल्म क्षेत्रात बस्तान चांगले बसत होते. पण नजमाला आपल्या रेम्बो होममधील मुलांना कायमचे घर मिळवून द्यायचे स्वप्नं असल्याने आपल्या हातात ठोस असे पैसे आणि निर्णय क्षमता असल्याशिवाय आपण काही करू शकणार नाही. थोडंसं फिल्म क्षेत्रापासून दूर झाली आणि तिने यूपीएससी करायचे ठरविले. त्यासाठी तिने स्वतःजवळची सर्व साठवलेली पुंजी यूपीएससीच्या क्लाससाठी लावली. एकीकडे अभ्यास, दुसरीकडे कॉलेजमधील काम आणि अधूनमधून चित्रपटातून जसे काम येईल तसे करून देणे हा तिचा दिनक्रम चालू झाला. नजमा सध्या 'मानवशास्त्र' या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. नजमा म्हणते, 'मी जर अधिकारी झाले तर रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी मला ठोस काहीतरी करता येईल, हे माझे स्वप्नं आहे.

logo
marathi.freepressjournal.in