आपण दररोज कश्याप्रकारचा आहार घ्यायला हवा हे तूुम्हाला माहीती आहे का? तुम्ही दररोज जे खाता त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आयुर्वेदात रोजच्या आहारात काय काय असायला हवं ? हे ठरवुन देण्यात आलेल आहे. तर आज आपण रोजच्या आहारात काय असायल हवे. या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. आयुर्वेदानुसार रोजच्या जेवणात गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट या 6 चवीचे पदार्थ असायला हवे. या चवींचा आहारात समावेश करताना एखादी चव आपल्याला खूप जास्त आवडू शकते त्यामूळे फक्त त्याच पदार्थाला प्राधान्य देणे चुकीचे आहे. जर तुमच्या शौचाचा खराब वास येत नसेल तर तुम्ही योग्य आहार घेत आहात असे समजावे. जर तुमच्या शौचाची दुर्गंधी येत असेल तर तुम्ही योग्य वेळी काळजी घेतलेली केव्हाही चांगले.
ऋतुमानानुसार आहार असावा
उष्मा, थंडी आणि दमट वातावरणामुळे आपल्या खाण्याच्या सवयीही बदलत असतात. त्यामुळे जसे वातावरण बदलते त्यानुसार तुम्ही आहारात बदल करायला हवे. पावसात अनेक आजारांनी डोकेवर काढलेले असते. अशावेळी आहारात चांगल्या गोष्टींचा समावेश करावा. ऋतुमानानुसार आहारात बदल करावे.
आहारात नेमक्या 'कोणत्या' गोष्टी असायला हव्यात-
गायीचे दुध- गायीच्या दुधाचा समावेश हा आहारात व्हायला हवा. जर तुम्ही नाश्त्याच्या वेळी जर दूध घेतले तर तुमच्या शरीराला अनेक चांगले घटक मिळण्यास मदत मिळते.
स्निग्ध पदार्थ- स्निग्ध पदार्थांचा आहारात समावेश करताना गायीच्या शुद्ध तुपाचा समावेश करायला हवा.
भाज्या- आठवड्यात दररोज पालेभाजी आणि कडधान्यही योग्य प्रमाणात असायला हवीत.
उपवास- आठवड्यातून एक दिवस तरी उपवास करायला हवा. उपवास हा आरोग्यासाठी चांगला असतो. उपवास करत असाल तर त्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली होण्यास मदत मिळते. शिवाय तुमचे पोटही स्वच्छ होण्यास मदत मिळते.
Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.