अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे 'ओवा'

ओव्यामध्ये वेदनशामक आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे सांधे आणि स्नायू वेदना कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे,
अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे 'ओवा'

अचानकपणे पोट दुखू लागलं की घरातील गृहिणी पटकन थोडासा ओवा खायला देते. ओवा खाल्ल्यामुळे पोटदुखी बरी होते असं म्हटलं जातं. ओव्यामध्ये वेदनशामक आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे सांधे आणि स्नायू वेदना कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, ज्यामुळे संधिवात, वात येणे, या समस्यांना दुर करण्यास मदत होतात.

आम्लपित्त, अपचन आणि पोट फुगणे यासारख्या दुखण्यांवर उपचार करण्यासाठी ओवा एक प्रभावी उपाय आहे. ओव्यामुळे पोट आणि आतड्याच्या जखमा बऱ्या होतात.

बीपी ,हृदयरोग आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पारंपारिक औषधांमध्ये ओव्याचा वापर केला जातो. ओव्याच्या सेवनाने रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि त्यांचा विस्तार होतो, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. आयुर्वेदानुसार, ओवा उच्च रक्तदाबाच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास चांगले काम करते.

ओवा एक प्रभावी अँटी-कफ एजंट म्हणून काम करते आणि फुफ्फुसातील हवेचा प्रवाह वाढवून खोकल्यापासून त्वरित आराम देते. हे श्लेष्मा सहजपणे बाहेर टाकून नाकातील अडथळे देखील दूर करते. दमा आणि ब्रॉन्कायटिस यांसारख्या श्वसनाच्या आजारांवर गुळासोबत ओव्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in