‘हि’ फळे नेहमी सालीसकट खा, शरीराला होतो दुप्पट फायदा

बऱ्याचदा डॉक्टरही फळं सालीसकट खाण्याचा सल्ला देतात, जाणून घ्या, नेमकी कोेणती फळं ही सालीसहीत खावीत आणि का खावी
‘हि’ फळे नेहमी सालीसकट खा, शरीराला होतो दुप्पट फायदा

रोजच्या आहारात वापरले जाणाऱ्या काही विशेष भाज्यांचे देठ किंवा एखाद्या फळाचे साल तुम्ही फेकून देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुम्ही जे साल फेकून देत आहात त्यामध्ये असे अनेक घटक समाविष्ट असतात, जे शरीराची पूर्ण काळजी घेण्यास सक्षम असतात. बऱ्याचदा डॉक्टरही फळं सालीसकट खाण्याचा सल्ला देतात, जाणून घ्या, नेमकी कोेणती फळं ही सालीसहीत खावीत आणि का खावी.

सफरचंद –

रोजच्या दिवसात एकतरी सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण तुम्ही अनेकांना सफरचंद सोलून खाताना पाहिले असेल. मात्र सफरचंदाच्या मुख्य गराप्रमाणेच त्याच्या सालीमध्येही विविध प्रकारचे पोषक घटक असतात. जे आपल्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकतात. सफरचंदाच्या सालीतून व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि पोटॅशियम मिळते. त्यामुळे सालीसकट सफरचंद खायला हवं

आंबा –

आंबा कच्चा असो वा पिकलेला तो कसाही खाल्ला तरी चवीलाही उत्तम आणि आरोग्यालाही उत्तम. सहसा आंबा खाताना त्याचा गर खाऊन साल फेकून दिली जाते. पण आंब्याच्या सालीमध्ये मॅंगीफेरिन, नोरेथ्रिओल आणि रेझवेराट्रोल सारखे उत्तम अँटि ऑक्सिडेंट असतात. जे फुफ्फुस, कोलन, स्तन, मेंदू आणि पाठीच्या कण्यातील कर्करोग तसेच इतर अनेक गंभीर आजार होण्यापासून आपले रक्षण करू शकतात.

संत्री –

संत्री खाताना त्याचे साल काढून आतून गर खाल्ला जातो. पण व्हिटॅमिन सी’ने समृद्ध संत्र्यामूळे शरीराची प्रतिकारशक्ती उत्तम राखली जाते आणि यासाठी केवळ गर नव्हे तर संत्याची साळी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन- सी हे संत्र्याच्या गरापेक्षा दुप्पट मात्रेत या फळाच्या सालीमध्ये आढळते. शिवाय संत्र्याच्या सालीमध्ये रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन-बी 6, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील असते. यामुळे सालीसह संत्रे अधिक फायदेशीर आहे.

जांभूळ –

पांडुरोग (अ‍ॅनिमिया), कावीळ, रक्तदोषाविकार या आजारांवर जांभूळ फायदेशीर आहे. जांभळाच्या सालीत नैसर्गिकरित्या लोह तत्त्व समाविष्ट असतात. शिवाय जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. शिवाय प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ व थोडय़ा प्रमाणात मेद असते. याचा योग्य पद्धतीने शरीराला लाभ हवा असेल तर जांभूळ न सोलता खा.

स्ट्रॉबेरी –

स्ट्राॅबेरीमध्ये व्हिटामीन सी, व्हिटॅमिन के, फाॅलीक अॅसीड, मॅग्नेशियम, मॅगनीज, आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. शिवाय या फळाच्या सालीमध्ये आणि गरामध्ये नैसर्गिक साखर समाविष्ट असते. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या फळाची साल काढून खाणे आरोग्यासाठी नुकसानदायी आहे. डाएटरी फायबरचा उत्तम स्त्रोत असणारी स्ट्रॉबेरी फायटोन्यूट्रियंट आणि फ्लोवोनाइडने समृद्ध असल्यामुळे सालीसकट खाण्याचा प्रयत्न करावा.

काकडी –

काकडी अत्यंत थंड फळ आहे. जे उष्ण तापमानात अधिक फलदायी ठरतं. काकडी सोलून न खाणे विशेष फायदेशीर आहे. कारण काकडीच्या गडद हिरव्या छटामध्ये बहुतेक अँटि ऑक्सिडंट्स, अघुलनशील फायबर आणि पोटॅशियमची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये व्हिटॅमिन- के’चे प्रमाणदेखील मोठे असते. त्यामुळे काकडी स्वच्छ धुतल्यानंतर सोलू नका तर सालीसकट खा. असे केल्याने शरीराचे हायड्रेशनदेखील उत्तमरीत्या राखले जाते.

logo
marathi.freepressjournal.in