आहारात घ्या चिमुटभर हिंग, आरोग्याचे फायदे मात्र ढिगभर

जवळपास प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात हिंग असतोच. जेवणाला एक आगळा वेगळा स्वाद किंवा चव आणण्यासाठी हिंगाचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे पदार्थांना एक छान सुगंध यावा यासाठी देखील पदार्थांमध्ये हिंग घातले जाते.
आहारात घ्या चिमुटभर हिंग, आरोग्याचे फायदे मात्र ढिगभर
Freepik
Published on

जवळपास प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात हिंग असतोच. जेवणाला एक आगळा वेगळा स्वाद किंवा चव आणण्यासाठी हिंगाचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे पदार्थांना एक छान सुगंध यावा यासाठी देखील पदार्थांमध्ये हिंग घातले जाते. मात्र, त्यासोबतच स्वयंपाक घरातला हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो. विशेष करून पोट विकारांमध्ये हिंगाचे अनेक फायदे होतात. जाणून घ्या सविस्तर...

बद्धकोष्ठावर उत्तम उपाय

बद्धकोष्ठाच्या तक्रार दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हिंगाचे चूर्ण पाण्यात मिसळून प्यावे. सकाळी पोट स्वच्छ होते तसेच हलके देखील होते.

गॅस आणि पोटफुगी

गॅस आणि जेवणानंतर पोटफुगी होत असेल तर हिंगाचे पाणी पोटावर लावावे, असे केल्यास गॅसचा त्रास कमी होतो. पोटफुगी होणे देखील हळूहळू कमी होईल.

भूक लागत नसल्यास जेवण्यापूर्वी हिंग तुपात भाजून आलं आणि लोणीसोबत सेवन करावे. याने भूक लागू लागेल.

काटा टोचल्यानंतर बाहेर काढता येतो

त्वचेत काटा, काच किंवा एखादी टोकदार वस्तू टोचल्यास हिंगाचे पाणी किंवा त्याचा लेप लावणे फायदेशीर ठरते. यामुळे टोचलेली वस्तू आपोआप बाहेर पडते.

कानाच्या वेदना थांबतात

तुम्हाला अचानक कानात वेदना होत असेल तर त्यावरही हिंगाचा उपाय केला जाऊ शकतो. कान दुखत असेल तर हिंग तेलात गरम करून त्याचे एक दोन थेंब कानात घाला. हळूहळू कानाच्या वेदना दूर होतील.

दातांच्या आरोग्यासाठी हिंग फायदेशीर

दातांच्या आरोग्य विशेष म्हणजे दातांमध्ये कॅविटी असेल तर हिंग फायदेशीर ठरते. रात्री दाताला हिंग लावून किंवा दाबून झोपल्यास दातांना लागलेली कीड दूर होते.

पोटात कळ येणे

अनेक वेळा चुकीच्या आहारशैली मुळे पोटात कळ येणे, पोटात दुखणे अशा प्रकारचा त्रास होतो. अशा वेळी जुणेजाणते लोक हिंगाने पोट शेकण्याचा उपाय करत. पोटात अचानक कळ येऊन दुखत असेल तर हिंगाने पोटाला शेक द्या. मात्र, खूप जास्त त्रास होत असेल तसेच हा त्रास वारंवार होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणे योग्य ठरते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in