नैसर्गिकरित्या केस काळे होण्यासाठी मेहंदी 'अशा' प्रकारे लावा; ट्रिक जुन्या काळातील पण फार उपयोगी

मेहंदी ही देखील आजकाल रासायनिक पदार्थमिश्रीत येते. त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे केस काळे करण्याऐवजी मेहंदी लावण्याची पारंपारिक ट्रिक वापरून पाहा.
नैसर्गिकरित्या केस काळे होण्यासाठी मेहंदी 'अशा' प्रकारे लावा; ट्रिक जुन्या काळातील पण फार उपयोगी
Ai Generated Image
Published on

वेगवेगळ्या कलरमध्ये केस रंगण्याचा कितीही ट्रेंड असला तरी आजही अनेकांना केस काळेभोर असावे, असेच वाटते. काळे कुळकुळीत केस चेहऱ्याचे सौंदर्य निश्चितच खूप खुलवतात. यासाठी अनेक जण काळा हेअर कलर करतात. तर ज्यांना हेअर कलर सहन होत नाही. त्यामुळे त्रास होतो असे लोक केस काळे करण्यासाठी मेहंदीचा उपयोग करतात. मात्र, मेहंदी ही देखील आजकाल रासायनिक पदार्थमिश्रीत येते. त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे केस काळे करण्याऐवजी मेहंदी लावण्याची पारंपारिक ट्रिक वापरून पाहा.

मेहंदीचे गुणधर्म

मेहंदी ही गुणांनी थंड असते. तसेच तिचे औषधी उपयोगही अनेक आहेत. भारतात मेहंदीचे झाड राजस्थान राज्यात मोठ्या प्रमाणात आढळते. मेहंदी नैसर्गिकरित्या लाल किंवा दाट तपकिरी रंग प्रदान करते. केसांना कलर करण्यासाठी मेहंदीचा उपयोग शतकानुशतके केला जात आहे.

मेहंदी योग्य पद्धतीने भिजवणे आवश्यक

केस काळे होण्यसाठी मेहंदी योग्य पद्धतीने भिजवणे आवश्यक असते. मेहंदी भिजवण्याचे अनेक प्रकार आहेत. सामान्यपणे आपण मेहंदी पावडर अर्धा तास आधी पाण्यात भिजत ठेवतो. नंतर अर्धा तास ती केसांना लावून ठेवतो. मात्र, या पद्धतीने मेहंदीला केसांना काळा रंग चढत नाही. तर केस लाल किंवा ब्राऊन रंगाचे होतात. तुम्हाला जर केस काळे करायचे असेल तर मेहंदी भिजवण्याची एक खास पद्धत आहे. ती जाणून घ्यावी लागेल.

अशा पद्धतीने मेहंदी भिजवा

मेहंदीने केसांना काळा रंग मिळवण्यासाठी मेहंदी लोखंडाच्या कढईत किंवा काळ्या लोखंडाच्या तव्यावर भिजवायला हवी. तसेच मेहंदी किमान तीन दिवस भिजवावी. यामुळे लोखांडाचे गुणधर्म मेहंदीत मिसळतात. अशा प्रकारे दर आठ दिवसांनी मेहंदी नियमितपणे केसांना लावल्यास तुमचे पांढरे केस तीन महिन्यात नैसर्गिकरित्या काळे होतील.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in