घरात झुरळ वाढली आहेत का? हे करा उपाय

घरात झुरळ वाढली आहेत का? हे करा उपाय

स्वयंपाक घरात जर स्वच्छता नसेल तर घरात झुकळ होतात. घरात झुरळे वाढू नयेत. यासाठी करा हे उपाय.

तुमच्याही घरात झुरळ वाढली आहेत का? स्वयंपाक घरात जर स्वच्छता नसेल तर घरात झुकळ होतात. आपल्या घरात जर खूप साहित्य असेल तर त्यावेळी घरात झुरळे हे वाढायला सुरुवात होते. अश्या वेळी घरात झुरळे वाढू नयेत. यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजेत हे माहिती घेऊया …

सिलिका एअरोजेल आणि साखर —

सिलिका एअरोजेल आणि साखर हे एकत्र करून घरात ठेवले तर घरातील झुरळे मरायला मदत होऊ शकते. आपल्या घरातील अडगळीच्या जागेवर तुम्ही हे औषध ठेवू शकता. यात काही प्रमाणात पुदिन्याचे तेल घातल्याने झुरळांचे प्रमाण कमी होऊ शकते.

कडुलिंबाची पाने —

जर तुम्ही तुमच्या घरात कडुलिंब याची पाने ठेवली तर सुद्धा घरातील झुरळयांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्याची पाने सुकवून ती पाने आपण आपल्या घरात झुरळयाच्या ठिकाणी ठेवून द्यावे.

काकडी —

काकडी चे काही तुकडे डब्यात ठेवून ते उघडे करून ठेवा. काही वेळात काकडी आणि टिन याचे रासायनिक क्रिया होऊन त्याचा वास हा जास्त प्रमाणात येतो त्यामुळे झुरळे हे मरते.

बोरिक —

बोरिक पावडर हि आपल्या धान्यासाठी वापरला जातो. बोरिक पावडर हे छोट्या छोट्या प्राण्यांना मारण्यास मदत करते. बोरिक ऍसिड मुळे किडे – मुंगे मारण्यास मदत होऊ शकते.

साबण आणि पाणी —

साबण आणि त्याचे पाणी हे हे आपल्या घरातली आजुबाजुंच्या भागात टाकून द्या. डिटर्जंट आणि पाणी एकत्र करून त्याचा वापर हा जास्त प्रमाणात दररोज करा.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in