
स्वयंपाक घरातील अनेक पदार्थ हे वेगवेगळ्या आजारावरील औषध असते. विशेष करून अनेक सौंदर्य समस्यांचे समाधान यातून मिळतात. अनेकवेळा आपल्या चेहऱ्यावर किंवा अंगावर एखादी जखम होऊन एखादा व्रण उठतो. तर कधी चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग पडतात. हे डाग आपल्या सौंदर्याला कमी करतात. त्यामुळे ते घालवण्यासाठी आपण अनेक वेळा डॉक्टर किंवा ब्यूटी पार्लर गाठतो. मात्र, हे फार खर्चिक पडते. तर स्वयंपाक घरातील काही पदार्थ या समस्या सोडवू शकतात. जाणून घ्या या घरच्या वैद्याबाबत.
बटाट्याची सालं
खरेतर बटाट्याची सालं आपण काढून फेकतो. मात्र, ही फार उपयुक्त असते. बटाट्याच्या सालीत अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. बटाट्याची सालं जखमेवर चोळल्यामुळे त्याचे व्रण कमी व्हायला लागतात.
लिंबू आणि टॉमॅटोचा रस
लिंबू आणि टोमॅटो हे तर प्रत्येकाच्या घरात असते. त्यामुळे याचा पॅक करू शकता. लिंबाच्या रसात टोमॅटोचा रस एकत्र करून जखमेवरील डागावर लावावा. १५ मिनिटे साधारण हा पॅक तसाच ठेवावा. लिंबातील अॅसिडमुळे जखमांचे डाग बरे होतात.
हळद
हळद हे तर अनेक आजारांवरील औषध आहे. फक्त जखमेचे डागच नाही. तर जखम भरून येण्यासाठी देखील हळदीचा लेप उपयुक्त ठरतो. एक चमचा हळदीत थोडे पाणी घालून ते गरम करावे आणि कोमट असतानाच लावावे. दररोज उपाय केल्यास डाग निघून जातात. याशिवाय हळद आणि लिंबाचा रस एकत्र करूनही तुम्ही पॅक तयार करू शकता.
मेथी दाण्याची पेस्ट
मेथी दाणे रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करून ही पेस्ट जखमेच्या व्रणांवर लावा. आठवडाभरात फरक जाणवेल.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)