'योगर्ट' की 'दही' हे दोन्ही पदार्थ एकच आहेत की वेगवगळे

अनेकदा योगर्टला दही समजण्याची चूक आपण करतो, पण या दोन्ही पदार्थामध्ये फरक आहे आणि तो आपल्याला जाणून घ्यायला हवा.
'योगर्ट' की 'दही' हे दोन्ही पदार्थ एकच आहेत की वेगवगळे

साधारण एकसारख्या दिसणाऱ्या पण नावं वेगवेगळी असलेल्या पदार्थामध्ये आपला नेहमीच संभ्रम उडतो. आता योगर्ट आणि दह्याचेच घ्या ना! दह्याचा फार पूर्वीपासून भारतीयांच्या आहारामध्ये समावेश होतो, पण हल्ली सुपर मार्केटमध्ये मिळणाऱ्या योगार्टचाही आपल्या आहारामध्ये समावेश होऊ लागला आहे. हे पदार्थ दिसायला एकसारखेच दिसतात. म्हणून आपला संभ्रम अधिक वाढतो. अनेकदा योगर्टला दही समजण्याची चूक आपण करतो, पण या दोन्ही पदार्थामध्ये फरक आहे आणि तो आपल्याला जाणून घ्यायला हवा.

योगर्ट हा मूळचा तुर्की भाषेतील शब्द आहे. प्राचीन मेसोपोटामिया संस्कृतीत या पदार्थाचा उल्लेख आढळतो. हजारो वर्षांपासून मध्यपूर्व देशांतील खाद्यसंस्कृतीमध्ये योगर्टचा वापर केल्याचेही संदर्भ आढळतात. दह्याप्रमाणे दुधावरील किण्वन प्रक्रियेने योगर्ट तयार होतं. दुधामध्ये असणाऱ्या लॅक्टोजचे किण्वन होऊन लॅक्टीक आम्लाची निर्मिती होते. योगर्ट तयार करण्यासाठी 'योगर्ट कल्चर' चा वापर केला जातो. म्हणजे ज्या जिवाणूंपासून योगर्ट तयार होतं त्या जिवाणूंची पैदास केली जाते. यासाठी प्रामुख्याने गाईच्या दुधाचा वापर केला जातो.

दह्यात व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी12, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, फॉस्फरस आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. योगर्टमध्ये सोडियम, व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. यासोबतच कर्डपेक्षा योगर्टमध्ये जास्त कॅलरीज असतात.

हाडे आणि दात मजबूत करण्यासोबतच दह्याचे सेवन पचनसंस्था निरोगी ठेवते. दुसरीकडे, योगर्ट खाल्ल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. अशा परिस्थितीत लठ्ठपणा कमी करण्यापासून ते ऑस्टियोपोरोसिस आणि संधिवात अशा अनेक समस्यांवर योगर्टचे सेवन सर्वोत्तम मानले जाते.

बाजारात योगर्टचे अनेक प्रकार उपलब्ध आहे, यात 'फ्रोझन योगर्ट', 'स्वीट योगर्ट', 'फ्लेवर्ड योगर्ट' असे अनेक प्रकार आहेत. त्यातून भारतीय बाजारपेठेत 'फ्लेवर्ड योगर्ट'ला जास्त पसंती आहे. वेगवेगळ्या फळांच्या चवीत फ्लेवर्ड योगर्ट बाजारात मिळते.

logo
marathi.freepressjournal.in