तुम्हालाही अत्तर वापरल्याने ऍलर्जी होते का? पाहा कोणत्या प्रकारचे अत्तर वापरायला हवे

अत्तराचा वापर करताना आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास हा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तसेच कोणत्या प्रकारचे अत्तर वापरायला हवे ते ही जाणून घेऊयात
तुम्हालाही अत्तर वापरल्याने ऍलर्जी होते का? पाहा कोणत्या प्रकारचे अत्तर वापरायला हवे

अनेकांना वेगवेगळे अत्तर, परफ्युम वापरायला आवडतात. अत्तरचा वापर करताना तुम्हाला कोणत्या प्रकारची ऍलर्जी नाही ना याची काळजी घ्यावी लागते. कारण अत्तरमध्ये बऱ्याच वेळा सुगंधी द्रव्य आणि काही केमिक्लसचा वापर केल्याने तुमच्या शरीराला त्रास व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे अत्तराचा वापर करताना आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास हा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तसेच कोणत्या प्रकारचे अत्तर वापरायला हवे ते ही जाणून घेऊयात

डार्क अत्तर –

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला खूप मोठ्या प्रमाणात गरमीमुळे घाम येण्यास सुरुवात होते. घाम आल्यामुळे आपल्या शरीराला दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. शरीराची दुर्गंधी येऊ शकते,दरम्यान अश्यावेळी बाजारात वेगवेगळे परफ्युम आणि अत्तर विकायला आलेले असतात. पण परफ्युमचा वापर करताना अनेकांना ऍलर्जी होते. बऱ्याच वेळा त्यामध्ये सुगंधी द्रव्य आणि काही केमिक्लस चा वापर केल्याने आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे नेमके कोणते अत्तर वापरायला हवे आणि अत्तराचा वापर करताना शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

वुडी अत्तर –

दरवेळी बाजारात नवीन अत्तराचा समावेश केला जातो. वुडी अत्तर भडक नसतात. त्यामुळे त्यांचा सुगंध डोकेदुखीदायक ठरत नाही. रसाळ फळांपासून त्याची निर्मिती करण्यात येत असल्याने दुसऱ्यांनाही त्याचा सुगंध सुखद अनुभव देणारा ठरतो.पुरुषांनी आपल्या
शरीराला उग्र पद्धतीचा किंवा जास्त वास असलेल्या परफ्युम चा वापर केला तरी चालू शकते.

फुलांचे अत्तर –

तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात घाम येत असेल तर तुम्ही फुलांचे अत्तर वापरू शकता. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणातही दुर्गंधी हि कमी होते. फुले हि सुवासिक असतात. त्यामुळे घामाचा वास हा अजिबात येणार नाही. वेगवेगळ्या फुलांचा वापर जर आपल्या शरीरासाठी केला तर मात्र आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते.

मंद सुगंध अत्तर –

फळांपासून तयार करण्यात आलेले अत्तर आणि परफ्यूम मंद सुगंध देणारे असतात.
हे अत्तर स्त्रियांसाठी जास्त लाभकारक असते. स्त्रियांना जास्त उग्र वास असलेली फुले आवडत नाहीत. या अत्तरांमध्ये रोजमेरी, लॅव्हेंडर, क्युमिन, कापूर आणि अन्य वनस्पतींपासून तयार करण्यात आलेले परफ्यूम मंद सुगंध देतात. रसाळ आणि चटकमटक स्वरूपात त्यांची पॅकिंग केली जाते.

logo
marathi.freepressjournal.in