
लहान बाळाची वाढ होत असताना त्याची हाडे बळकट होण्यासाठी तसेच चांगली वाढ होण्यासाठी पूर्वापार परंपरेने बाळाला तेलाने मालीश करण्याची पद्धत आहे. लहान बाळाला तेलाने मालीश करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मालीशसाठी तेल कोणते वापरावे मालीशला सुरुवात कशी करावी किती पायऱ्यांमध्ये मालीश करावी. अशा अनेक गोष्टी असतात. जाणून घेऊया योग्य पद्धत काय आहे.
कोणते तेल वापरायला हवे?
बाजारात लहान बाळांच्या मालीशसाठी अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही राहता त्या प्रदेशानुसार तेथील उपलब्ध पारंपारिक तेलाने मालीश करणे हे सर्वोत्तम असते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय तुम्ही खोबरेल तेल, बदाम तेल, सूर्यफूल तेल, मोहरी तेल वापरू शकता. मोहरीचे तेल लहान बाळांच्या हाडांच्या बळकटीकरणासाठी आणि विकासासाठी उत्तम असते, असे मानले जाते. हे सर्व तेल पारंपारिक पद्धतीने काढलेले असावेत. यामुळे जास्त फायदा होतो. याशिवाय गायीच्या तुपाचा देखील उपयोग करता येऊ शकतो.
मालीश करण्याचे फायदे
सुखद झोप – मालीश केल्याने बाळाच्या स्नायूंना आणि मज्जासंस्थेला आराम मिळतो. त्यामुळे बाळ शांत होते आणि चिडचिड कमी होते. झोपेच्या सवयी सुधारतात.
पचन सुधारते – सौम्य मालीश केल्याने रक्तसंचार सुधारतो, ज्यामुळे पचन चांगले होते आणि गॅस, अपचन व फुगण्याची समस्या कमी होते.
हाडांची वाढ – मालीश केल्याने रक्तसंचार सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. आवश्यक पोषण मिळाल्यामुळे हाडांची योग्य वाढ होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते – नियमित तेल मालीश केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे शरीरातील रक्तपेशी संसर्गाशी लढण्यास सक्षम होतात.
नियमित मालीश केल्याने बाळाचे आरोग्य सुधारते आणि ते निरोगी वाढते.
मालीश करताना काय काळजी घ्याल?
बाळाला मालीश करताना विशेष काळजी घ्यावी लागते. ही काळजी पुढील प्रमाणे घ्यावी,
मानेला योग्य प्रकारे सांभाळणे
बाळाच्या शरीराला मालीश करताना त्याची मान योग्य प्रकारे जपायला हवी. बाळाच्या मानेला कोणत्याही प्रकारे लचका बसणार नाही याची काळजी घ्याल.
दाब व्यवस्थित असावा
बाळाला मालीश करताना हाताचा दाब व्यवस्थित असावा. बाळाचे हाडे नाजूक असतात. त्यामुळे मालीश करताना हलक्या हाताने मालीश करावी.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)