केसांची स्टाईलींग करताना 'या' चुका करणे टाळा,पाहा कशी टाळावी केसगळती

केसांचे नुकसान टाळण्यासाठी स्टायलिंग करायचीच नाही का? स्टायलिंग करताना काही मर्यादा पाळल्यास, विशेष काळजी घेतल्यास केसांचे होणारे नुकसान भरून काढता येईल.
केसांची स्टाईलींग करताना 'या' चुका करणे टाळा,पाहा कशी टाळावी केसगळती
Published on

केस विंचरल्यावर डोक्यापेक्षा कंगव्यावर अधिक केस असतात का? ताण, वय आणि हार्मोनल बदल यामुळे केसगळती होते. तसंच तुम्ही केसांची कोणती स्टाइल करता, त्यासाठी कोणती साधने वापरता यावर देखील केस गळण्याचे प्रमाण अवलंबून आहे. कारण त्यामुळे केसांना हानी पोहचते. म्हणून केसांचे नुकसान टाळण्यासाठी स्टायलिंग करायचीच नाही का? अगदी तसेच नाही. पण स्टायलिंग करताना काही मर्यादा पाळल्यास, विशेष काळजी घेतल्यास केसांचे होणारे नुकसान भरून काढता येईल. केसांचे नुकसान, केसगळती कशी टाळावी, हे सांगितले.

हेव्ही हेअर एक्सटेन्शन्स वापरणे - हेव्ही हेअर एक्सटेन्शन्स वापरल्याने डोके जड झाल्यासारखे वाटते. डोक्यावर, केसांवर वजन येते व त्यामुळे केस गळू लागतात. तसंच ६-८ आठवड्यांसाठी एक्सटेन्शन्स हलके असले तरी वापरू नका. कारण त्यामुळे केस तुटू लागतील. हलके एक्सटेन्शन्स वापरा, पण जास्त वेळासाठी ते केसांवर ठेवू नका. त्यामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.

पोनी बांधण्यासाठी इलॅस्टिक रबरबँड वापरणे- इलॅस्टिक रबरबँडने पोनी बांधल्यास केस अगदी सहज तुटतात. रबर काढताना केस तुटू लागतात. म्हणून इलॅस्टिकऐवजी कपड्याचे रबरबँड वापरा. ते केसांतून सहज निघतात व त्यामुळे केस देखील तुटत नाहीत.

ओले केस ब्लो ड्राय करणे- ओले केस सुकवण्यासाठी ब्लो ड्राय करू नका. कारण त्या उष्णतेमुळे केस खराब होऊ शकतात. तसंच केसांचे नुकसान टाळण्यासाठी ओल्या केसांची कोणतीही स्टाइल करू नका.

स्टायलिंगची विविध साधने वापरणे- काहीजणांना प्रत्येक वेळीबाहेर किंवा पार्टीला जाताना केस ब्लो ड्राय करण्याची सवय असते. केस कर्ल किंवा स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनर, आयनिंग मशीन नियमित वापरल्याने केसांचे स्वरूप बिघडते व केस तुटू लागतात. म्हणून केस जितक्या नैसर्गिक स्थितीत ठेवता येतील तितके अधिक चांगले. तसंच गरज असल्यास या साधनांचा वापर केल्यानंतर केसांना तेलाने मालिश करा. त्यामुळे केस खराब होणार नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in