'या' आयुर्वेदिक पदार्थांनी यकृत करा डिटॉक्सिफाय; पोटाच्या समस्या होतील दूर
आपल्या शरिरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे यकृत. यकृताच्या समस्येकडे जास्त दुर्लक्ष करणे चांगले नाही. जर तुम्हाला यकृताच्या कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुमच्या आहारात हे आयुर्वेदिक पदार्थ समाविष्ट करा.
शरिरात यकृताचे महत्त्व
यकृत हा आपल्या शरिरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. जो शरिरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. यकृत योग्य पचन आणि शरिराच्या इतर अवयवांची कार्यक्षमता राखण्याचे काम करते. अशा परिस्थितीत यकृत निरोगी राहणे खूप महत्वाचे बनते. आयुर्वेदात यकृताच्या विषारीपणासाठी अनेक नैसर्गिक पदार्थ आणि औषधी वनस्पतींचा उल्लेख आहे. या वनस्पती केवळ यकृताचे कार्य सुधारत नाहीत तर शरिरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास देखील मदत करतात. इथे आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या आयुर्वेदिक पदार्थांबद्दल सांगत आहोत जे यकृताला निरोगी ठेवते.
१. मुळा - मुळा यकृताला विषमुक्त करण्यात सर्वात प्रभावी आहे. मुळा खाल्ल्याने पित्त शांत होते, ज्यामुळे उन्हाळ्यात शरिराला थंडावा मिळतो.
२. कमळ काकडी- कमळाची काकडी म्हणजे कमळाच्या फुलांची मुळे. भारतात ही भाजी म्हणूनही खूप प्रसिद्ध आहे. त्याची भाजी, पकोडे आणि इतर अनेक पदार्थ बनवले जातात. ते चवीला छान लागते, कमल काकडी खाल्ल्याने शरिरातील उष्णता कमी होते आणि यकृताची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते. तुम्ही कमळ काकडीचा सूप बनवू शकता आणि पिऊ शकता.
३. पुनर्नव- पुनर्नव ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी ब्लॉकेजची समस्या दूर करण्यास मदत करते. ही वनस्पती यकृतामध्ये जास्त पाणी साचण्यापासून रोखते आणि यकृताचे कार्य सुधारते. तुम्ही त्याचा रस पिऊ शकता किंवा देशी तुपात शिजवून खाऊ शकता.
४. कालमेघ- कालमेघ विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. हे एक शक्तिशाली द्रव्य आहे, जे पित्त संतुलित करते. तुम्ही ते हर्बल चहासारखे पिऊ शकता.
५. मकोय- जर तुम्हाला यकृतात सूज येण्याची समस्या असेल तर तुम्ही मकोयचे सेवन करू शकता. ते खाल्ल्याने हेपेटायटीसच्या समस्येपासूनही आराम मिळतो. मकोय हे यकृतासाठी एक औषध मानले जाते. ज्या लोकांना नेहमी यकृताची समस्या असते त्यांनी दररोज मकोय खावे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)