
तुमच्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल करून आयुर्वेदाचे काही छोटे छोटे नियम पाळून तुम्ही असे अप्रतिम सौंदर्य आणि फिटनेस मिळवू शकता. ज्यामुळे तुम्ही चाळीशीतही २४ वर्षाचे युवा दिसू शकता. भारतात महर्षि वाग्भट हे आयुर्वेद ऋषी होऊन गेले. त्यांनी अष्टांग हृदयम आणि अष्टांग संग्रहम हे ग्रंथ लिहिले आहेत. आज वाग्भट आयुर्वेद म्हणून त्यांच्या ग्रंथांना ओळखले जाते. वाग्भट आयुर्वेदात वात-कफ-पित्त संतुलनासाठी दिनचर्या कशी असावी याविषयी काही नियम सांगतिले आहेत. यातीलच एक महत्त्वाचा नियम सूत्र किंवा फॉर्म्युला आहे ४०-४० चा, जो तुम्हाला चाळीशीत २४ वर्षाच्या युवासारखे सौंदर्य देईल. प्रथम जाणून घेऊ काय असतात वात-कफ-पित्त दोष आणि का करायला हवे त्यांचे संतुलन.
काय आहे वात-कफ-पित्त दोष
वाग्भट यांच्यासह सर्वच आयुर्वेदाचार्यंनी माणसाला होणारे जवळपास अनेक आजार शरीरातील वात-कफ-पित्त यांच्या असंतुलनामुळे निर्माण होतात, असे मानले आहे. शरीरात वात-कफ-पित्त असे त्रिदोष असतात. ज्यांचे योग्य ते संतूलन राखले तर तुमचे शरीर निरोगी राहते, काया चमकदार राहते आणि तुम्हाला तरुण ठेवते, असे त्यांनी म्हटले आहे.
वाग्भट आयुर्वेदानुसार शरीरातील वात बिघडले तर ८० रोग होतात. पित्त बिघडल्यास ५० रोग होतात आणि कफ बिघडल्यास ३८ रोग होतात. यामध्ये पोट, त्वचा, स्नायूंशी संबंधित आजार मुख्यत्वे करून होतात. पोटाचे आजार झाल्यास त्यातून त्वचेचे विकार संभवतात. ऋषी वाग्भट यांनी जेवणासंबंधी काही नियम सांगितले आहेत. त्यांचे पालन केल्यास तुमचे वात-कफ-पित्त बिघडणार नाही. परिणामी तुम्ही रोगमुक्त निरोगी राहाल आणि तुमचे वय अधिक तरुण दिसेल.
काय आहे जेवणाचा ४०-४० चा फॉर्म्युला
ऋषी वाग्भट सांगतात की जेवणापूर्वी ४० मिनिटे आणि जेवणानंतर ४० मिनिटे अजिबात पाणी पिऊ नये. याचे मोठे दुष्परिणाम अन्न पचनाशी संबंधीत होतात. परिणामी विविध आजारांना सामोरे जावे लागते. वाग्भट यांनी भोजनांती पाणी हे विषसमान असते, असे म्हटले आहे.
याला विस्ताराने समजावून सांगताना ते म्हणतात. अन्न पचवण्याचे कार्य अग्नि करते. तुम्ही खाण्यासाठी सुरुवात केल्यानंतर लगेचच जठराग्नी पेटतो. खाल्लेले अन्न जठरात जाते. तिथे हा जठराग्नि अन्नाचे पाचन करतो. मात्र, जेवणाच्या आधी किंवा जेवण करताना आणि जेवणानंतर लगेचच पाणी पिल्याने हा जठराग्नि व्यवस्थित पेटत नाही. किंवा विझून जातो. परिणामी अन्नाचे पचन न झाल्यामुळे पचनासंबंधी आजार होतात. त्यातूनच पुढे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार जसे चेहऱ्यावर पुटकुळ्या येणे, पिंपल्स, झुलड्या पडणे, केसांच्या समस्या निर्माण होतात.
त्यामुळे जेवणाआधी ४० मिनिटे पाणी पिऊन घ्यावे. तसेच जेवणानंतर ४० मिनिटांनी पाणी प्यावे. त्यामुळे पाचनक्रिया सुधारते. तुम्ही निरोगी राहता. निरोगी काया चमकदार दिसते. त्यामुळे तुमचे वय कमी दिसते. तुम्ही अधिक तरुण दिसता. हाच आहे वाग्भट यांचा चाळीशीत २४ वर्षाचे दिसण्याचा ४०-४० चा फॉर्म्युला एकदा नक्की ट्राय करून पाहा.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)