फक्त एक चमचा बेकिंग सोडा आणि त्वचा होईल चमकदार; मुरूम आणि डागांपासूनही सुटका; जाणून घ्या कसा उपयोग करावा

बेकिंग सोडा हा तसा विविध खाद्य पदार्थात वापरला जातो. मात्र, या व्यतिरिक्त बेकिंग सोड्याचे औषधीय उपयोग खूप जास्त आहे. विशेषकरून त्वचा आणि दातांसाठी तर बेकिंग सोडा खूपच उत्तम असतो. त्वचेचे अनेक आजार जसे की मुरुम, डाग पडणे यावर फक्त एक चमचा बेकिंग सोडा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. जाणून घ्या त्वचेच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी बेकिंग सोड्याचा उपयोग कशा प्रकारे करावा.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्रFreepik
Published on

बेकिंग सोडा हा तसा विविध खाद्य पदार्थात वापरला जातो. मात्र, या व्यतिरिक्त बेकिंग सोड्याचे औषधीय उपयोग खूप जास्त आहे. विशेषकरून त्वचा आणि दातांसाठी तर बेकिंग सोडा खूपच उत्तम असतो. त्वचेचे अनेक आजार जसे की मुरुम, डाग पडणे यावर फक्त एक चमचा बेकिंग सोडा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. जाणून घ्या त्वचेच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी बेकिंग सोड्याचा उपयोग कशा प्रकारे करावा.

बेकिंग सोड्याचे गुणधर्म

बेकिंग सोड्याला रासायनिक भाषेत सोडियम बायकार्बोनेट (Sodium Bicarbonate) म्हणतात. रंगाने पांढरा दिसणारा हा सोडा अल्कधर्मी आहे. त्यामुळे आम्लाशी प्रतिक्रिया देऊन तो त्याला निष्क्रिय करतो. याशिवाय बेकिंग सोड्याचे अँटिबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे हे एक प्रकारचे अँटीसेप्टीक औषध म्हणूनही उपयोगी पडते. स्वयंपाक घरात बेकिंग सोडा विविध खाद्य पदार्थ बनवण्यासाठी लागत असल्याने तो घरात नेहमीच सहज उपलब्ध असतो. त्वचा, दात आणि नखांची काळजी घेण्यासाठी बेकिंग सोडा कसा वापरावा जाणून घेऊया...

दात

बेकिंग सोडा हा दातांवरील पिवळेपणा दूर करण्यास मदत करतो. यासाठी बेकिंग सोड्याची पावडर टूथपेस्ट सोबत घेऊन मग ब्रश करावे. नंतर गुळण्याकरून तोंड स्वच्छ धुवावे. नियमित प्रयोग केल्यास दातांवरील पिवळा थर किंवा पिवळे डाग पूर्णपणे नाहीसे होतील. मात्र, याचा उपयोग एका सीमित कालावधीसाठी केला तरच ते फायदेशीर ठरते. अन्यथा बेकिंग सोड्यामुळे दातांवरील नैसर्गिक एनामेलची परत निघून जाईल.

त्वचेसाठी बेकिंग सोड्याचा करा असा उपयोग

मुरुम

चेहऱ्यावर जर मुरुम आले असतील तर एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मुरुम आहेत त्या ठिकाणी लावावी. बेकिंग सोड्यातील अँटिसेप्टिक गुणधर्म मुरुमांचा नायनाट करण्यासाठी फार प्रभावी ठरतात.

मान काळवंडली असेल तर

अनेक वेळा उन्हामुळे किंवा अन्य कारणामुळे मान काळवंडते. यावरही बेकिंग सोडा हा खूपच उपयोगी आहे. बेकिंगसोड्यात नैसर्गिकरित्या ब्लीचिंग आणि एक्सफोलिएटिंगचे गुणधर्म आहेत. आंघोळीपूर्वी एक चमचा बेकिंग सोडा खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून ही पेस्ट मानेवर जिथे काळवंडले आहे तिथे लावावे. दररोज हा उपाय केल्यास अवघ्या १५ दिवसांत तुम्हाला फरक जाणवू शकतो. याशिवाय हाताचे कोपर आणि पायाचा घोटा यांवरही अनेकवेळी काळपटपणा चढतो. त्यासाठी देखील ही पेस्ट उपयोगी ठरते.

त्वचेला सातत्याने खाज येत असेल तर...

त्वचेला सातत्याने खाज येत असेल तर बेकिंग सोडा त्यावर प्रभावी ठरू शकतो. यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करून ते पाणी अंगावरून घ्यावे.

नैसर्गिक दुर्गंधीनाशक

बेकिंग सोडा हा नैसर्गिकरित्या दुर्गंधीनाशक आहे. त्यामुळे हा काखेत आणि पायांमध्ये चपलांमुळे आलेली दुर्गंधी दूर करतो.

ॲलर्जीवर उपयुक्त

बेकिंग सोडा हा अल्ता किंवा सौंदर्य प्रसाधनांमुळे झालेल्या ॲलर्जीवर चांगला प्रभावी ठरतो. उदाहरणार्थ अनेक धार्मिक कार्यक्रमांसाठी महिला अलता लावतात. मात्र, अनेक जणींना या अलताची ॲलर्जी असते. अलतामुळे झालेल्या ॲलर्जीवर बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करून लावल्यास त्याने रॅशेस लवकर दूर होतात.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in